आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special |Depression Anxious Women May Also Have An Impact On Their Children, A Feeling Of Not Helping And Undermining Themselves

डिप्रेशन, चिंताक्रांत महिलांच्या मुलांमध्ये न्यूनगंड, इतरांना मदत न करण्याची येऊ शकते भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • न्यूयॉर्कच्या सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठाच्या नियतकालिकातील दावा
  • प्रत्येकी २० प्रश्न, ८८ टक्के महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे

न्यूयॉर्क - भलेही ती सांगत नसेल. एवढेच नव्हे तर ती आपली चिंतादेखील दाखवत नसावी. परंतु, माझी आई माझ्या चुकांमुळे दु:खी व निराश आहे. आपल्या आईच्या मानसिक स्थितीबद्दल असा विचार करणारी मुले स्वत:च डिप्रेशनचे शिकार ठरू शकतात. एवढेच नव्हे तर इतरांना मदत न करणे, अपयश आणि स्वत:ला इतरांपेक्षा कमी लेखण्याची भावनाही निर्माण होऊ शकते, असा दावा न्यूयॉर्क येथील सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन फॅमिली सायकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील प्रमुख व एसएमयूमध्ये मानसशास्त्राच्या प्रोफेसर डॉ. क्रिस्टिना कोरोस म्हणाल्या, आईच्या चिंतेसाठी स्वत:ला दोषी ठरवतात व नकारात्मक विचाराच्या दिशेने वाटचाल करत असतात. अशा मन:स्थितीत असणाऱ्या मुलांना सकारात्मक अशा उपचारांतून लाभ होऊ शकतो. परंतु, डिप्रेशनच्या उच्च पातळीवरील मातांना आपल्या मुलांच्या बाबतीत भविष्यात डिप्रेशनच्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. मातांना आपल्या मुलांमध्ये निराशा व घबराट अशी लक्षणे दिसून आली का, अशी विचारणाही पाहणीतून करण्यात आली होती. बहुतांश महिलांनी त्याचे होकारार्थी उत्तर दिले. या प्रकल्पात चार वर्गीकरणांद्वारे मुलांचीही पाहणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डॉ. कोरोस म्हणाल्या, आईच्या संकेतांना लक्षात घेऊन मुलांनी व्यक्तिगत पातळीवर जबाबदारपणा अनुभवला तर ते आपल्या आईला अशा स्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू शकतात. 
भलेही हे प्रयत्न निश्चित अशा पद्धतीने केलेले नसतील तरीही चालतील. परंतु, दुसरीकडे असहकार्य, अपयश व न्यूनगंडाची भावना मात्र त्यांच्यात बळावू शकते, अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली. प्रत्येकी २० प्रश्न, ८८ टक्के महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे


संशोधकांच्या मते १३ वर्षांहून कमी वयाची मुले व महिलांना प्रत्येकी २० प्रश्न विचारण्यात आले. त्यास मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण केल्यानंतर ८८ टक्के महिलांमध्ये डिप्रेशन व चिंतेची लक्षणे दिसली. त्यापैकी सुमारे १२ टक्के महिलांत तर डिप्रेशन मोठ्या प्रमाणात आढळून येते. काम करण्यात माझे मन लागत नाही, मी सर्व इच्छा सोडून दिल्या आहेत, विशिष्ट काम करण्याची इच्छा होत नाही का? महिलांना हो किंवा नाही असेही प्रश्न विचारण्यात आले होते.