आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special : Dhoni Will Patrol With AK 1 In Srinagar Wearing A Bulletproof Jacket

DvM Special : श्रीनगरमध्ये बुलेटप्रूफ जॅकेट घालून एके-४७ सह गस्त घालणार धाेनी, अधिकारी नव्हे तर ६० सैनिकांसाेबत बराकीत राहील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - क्रिकेट संघाचा माजी कर्णधार लेफ्टनंट कर्नल महेंेद्रसिंह धाेनी बुधवारी काश्मीरच्या दहशतवादविराेधी पथकात प्रथमच तैनात हाेईल. ताे पॅरा कमांडाेच्या बटालियनमध्ये १५ दिवस कर्तव्य बजावेल. धाेनी १५ आॅगस्टही तिथे साजरा करेल. यानंतर ताे प्रशिक्षणासाठी बंगळुरूला जाणार आहे. दहशतवादग्रस्त भागात धाेनीला २० किलाेच्या सामग्रीसह चालावे लागेल. पॅरा कमांडाेच्या ज्या तुकडीत धाेनी तैनात हाेणार आहे, ती संमिश्र सैनिकांची तुकडी आहे. तिथे देशातील प्रत्येक भागातून आलेले ७०० सैनिक आहेत. यामध्ये गाेरखा, शीख, राजपूत, जाट यासारख्या सर्व रेजिमेंटचे जवान सहभागी आहेत. ताे अधिकाऱ्यांसाठीच्या निवास व्यवस्थेएेवजी जवानांच्या बराकीत राहील. ताे ५०-६० जवानांमध्ये झाेपेल. धाेनी जवानांसाठी बनवलेल्या छाेट्या बाथरूममध्येच स्नान करेल. स्वादिष्ट बटर चिकनसाठी आेळखल्या जाणाऱ्या या बटालियनमध्ये आठवड्यातील तीन दिवस धाेनीला चिकन मिळेल. धाेनीला २०११ मध्ये लष्कराच्या टेरिटाेरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नलपद मिळाले हाेते.

 

१. गस्त... 

श्रीनगरच्या बादामी बाग कँट भागात धाेनी ८-१० सैनिकांसाेबत गस्त घालेल. त्याला बुलेटप्रूफ जॅकेट, एके-४७ रायफल व ६ ग्रेनेड दिले जाईल. या ड्यूटीचा उद्देश लाेकांसाेबत समन्वय व तेथील गुप्त माहिती जमा करणे हा असतो.


२. गार्ड ड्यूटी... 

धाेनीला गार्ड युनिटच्या सुरक्षेचे काम मिळेल. हे काम ४-४ तासांच्या दाेन शिफ्टमध्ये हाेईल. ही दिवस व रात्र दाेन्ही प्रकारची ड्यूटी आहे. दिवसाच्या ड्यूटीवर सकाळी ४.०० वाजता उठावे लागेल. रात्रीची ड्यूटी असल्यास सकाळी सकाळी लवकर उठण्यापासून सूट मिळेल.

 

३. पाेस्ट ड्यूटी... 

त्याला खंदकात पापणीही लवणार नाही एवढ्या सतर्कतेने उभे राहावे लागू शकते. असे २-२ तासांच्या शिफ्टमध्ये तीन वेळा हाेईल. ही ड्यूटी धाेनीच्या धैर्याची परीक्षा घेईल. शांत उभे राहणे व न हलता लाेकांची ये-जा हाेताना पाहणे हे पाेस्ट ड्यूटीचे सर्वात महत्त्वाचे काम आहे.

 

अशा पद्धतीने २० किलाे वजन वाढेल धाेनीचे
३ मॅगझिन५ किलो
पाेशाख  ३ किलो
बूट२ किलो
३ ते ६ ग्रेनेड४ किलो
हेल्मेट१ किलो 
बुलेटप्रूफ जॅकेट४ किलो

बातम्या आणखी आहेत...