आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : जगातील १९४ शहरांत डाॅ. दीक्षित डाएट प्लॅन वाॅकेथाॅन; या आहारावर अमेरिकेतील डाॅक्टरांनी सुरू केले संशाेधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मधुमेहमुक्तीविराेधात लढा निर्माण करणाऱ्या डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी डाएट प्लॅनद्वारे एक क्रांती निर्माण केली आहे. वजन कमी करण्याबरोबरच मधुमेह दूर हाेण्यास यामुळे जगभरातील नागरिकांना मदत हाेत आहे. या डाॅ. दीक्षित डाएट प्लॅनबाबत अधिकाधिक नागरिकांना माहिती व्हावी यासाठी १५ सप्टेंबर राेजी थ्रीडी वाॅकेथाॅनचे २० देशांतील १९४ देशांमध्ये एकाच दिवशी रंगणार आहे. डाॅ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीचे आैचित्य साधून आयाेजित या कार्यक्रमातून अनाेखा विक्रम नाेंदवला जाणार आहे. सुमारे ५ किलाेमीटरचा हा वाॅकेथाॅन असेल. या माध्यमातून नागरिकांमध्ये दैनंदिन आहारशैलीबाबत जनजागृती केली जाईल. तसेच डाएट प्लॅनबाबतही माहिती दिली जाणार आहे. 

डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांचा क्रांतिकारी डाएट प्लॅन फाॅलाे करत असलेल्या २० देशांतील १९४ शहरांमध्ये १५ सप्टेंबर राेजी एकाच वेळी या उपक्रमाचे आयाेजन करून विश्वविक्रम नाेंदवला जाणार आहेे. दिवसातून दाेनच वेळा जेवण अन् ४५ मिनिटे व्यायाम या संकल्पनेतून मधुमेहापासून मुक्ती अशी संकल्पना मांडत डाॅ. दीक्षित यांनी आराेग्य क्षेत्रात क्रांती आणली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात त्यांचे लाखाे फाॅलाेअर्स आहेत.
 

या आहारावर अमेरिकेतील डाॅक्टरांनी सुरू केले संशाेधन
बृहमहाराष्ट्र मराठी मंडळाच्या सहकार्याने आयाेजित दाैऱ्यात सुमारे ४० दिवस डाॅ. दीक्षित अमेरिकेत हाेते. तिथे दीक्षित डाएटचे आधीपासूनच अनेक फाॅलाेअर्स आहेत.  डाॅ. स्वानंद, डाॅ. म्हसकर व डाॅ. निगाेट यांनी या आहारावर संशाेधनही सुरू केले आहे.  त्यासाठी त्यांना डाॅ. रत्ना अष्टेकर व डाॅ. क्षमा जाेशी यांच्याकडून मदत केली जात असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  मधुमेह मुक्तीसाठी वैश्विक लढा निर्माण करणाऱ्या डाॅ. दीक्षित यांचा नाशिकमध्ये अॅड्रार ट्रस्टच्या विश्वस्तांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. संदीप साेनवणे, डाॅ. रत्ना अष्टेकर, डाॅ. अरुणा काळे, संजय माेरे, संजय भारसे, वंदना जाेशी, अपर्णा माेरे यांनी यांनी हा उपक्रम आयाेजित केला हाेता.
 

मधुमेहविराेधात वैश्विक लढा 
अमेरिकेतील नागरिकांमध्येही मधुमेहाबराेबर लठ्ठपणाचेही प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर डाॅ. दीक्षित यांनी नुकताच या देशाचा दाैरा करून ४० दिवसांमध्ये ठिकठिकाणी २३ व्याख्याने दिली.  तेथील ४ ते ५ हजार भारतीयांना डाॅ. दीक्षित यांचा डाएट फाॅलाे करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेनंतर आगामी काळात आॅस्ट्रेलिया, सिंगापूर व कॅनडा येथील नागरिकांसाठी कार्यक्रम घेणार असून मुधमेहमुक्तीसाठी वैश्विक लढा उभारणार असल्याचे डाॅ. जगन्नाथ दीक्षित यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.  डाॅ. दीक्षित डाएट प्लॅन फाॅलाे करणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांना मार्गदर्शन तसेच प्रश्न साेडवण्यासाठी खास व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. या ग्रुपच्या माध्यामातूनच त्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचेही डाॅ. दीक्षित यंानी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...