आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special: Everybody Should Plant Ten Trees Now To Rectify The Mistake Made By Their Ancestors: Sayaji Shinde

DvM Special : पूर्वजांनी केलेली चूक सुधारण्यासाठी आता प्रत्येकाने दहा झाडे लावावीत : सयाजी शिंदे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी  - आपल्या आजोबा-पणजोबांनी वृक्षतोड केल्याने आज जमीन रुक्ष झाली. पाण्यावरची परळी म्हणून असलेली ओळख लुप्त झाली असून आता राखेवरची परळी म्हणून ओळखली जात आहे. पूर्वजांनी केलेली ही चूक सुधारण्यासाठी प्रत्येकाने किमान दहा झाडे लावावीत, असे आवाहन सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. परळीत वृक्षमित्रांच्या वृक्षचळवळीअंतर्गत सयाजी शिंदेंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने शुक्रवारी वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला.

सकाळी साडेनऊ वाजता वृक्षलागवड- वृक्षसंवर्धन चळवळीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत सयाजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सायकल रॅली काढली. बसस्थानक, एक मिनार चौक, मोंढा, राणी लक्ष्मीबाई टॉवर, गणेशपार, नांदूरवेस, अंबेवेस, नेहरू चौक मार्गे  आनंदधाम लिंगायत स्मशानभूमीत वृक्ष लागवडस्थळी पोहेचली. या वेळी सयाजी शिंदे यांच्या हस्ते रॅलीतील विद्यार्थ्यांसमवेत वृक्षारोपण केले व हे लावलेली रोपे जोपासण्याची शपथ दिली. या वेळी व्यासपीठावर चित्रपट लेखक अरविंद जगताप, विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, रिपाइं नेते धम्मानंद मुंडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, कृषिभूषण शिवराम घोडके, पर्यावरणतज्ज्ञ वायगणकर  यांची उपस्थिती होती. या प्रसंगी अरविंद जगताप यांनीही वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले.   

राेपट्यांची जबाबदारी घेतली शिक्षक, विद्यार्थ्यांनी :
रॅलीत  परळी शहरातील सहा शाळांच्या ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. वृक्षलागवड व संवर्धनाचा संदेश देत ही रॅली आनंदधाम लिंगायत स्मशानभूमीत पोहचली. तेंव्हा  वडाच्या नावानं चांगभलं...  अशा घोषणांनी परिसर दणाणला.  लागवड केलेल्या सर्व रोपट्यांची जोपासणा करण्याची जबाबदारी वैद्यनाथ विद्यालय, फाउंडेशन स्कूल, अभिनव विद्यालय, इमदादूल हायस्कूल या शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतली.