आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DVM Special : He Used To Suffers From Dyslexia, Joined Politics At The Age Of 14

DVM Special : डिसलेक्सियाने पीडित होते, वयाच्या १४ व्या वर्षी राजकारणाचा श्रीगणेशा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोशुआ वोंग यांनी वयाची २३ वर्षेही पूर्ण केली नाहीत. मात्र, हाँगकाँगमधील लाखो लोक त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या एकवटले आहेत.हाँगकाँगमध्ये त्यांच्या नेतृत्वात ३१ मार्चपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन २०१४ मधील अंब्रेला चळवळीपेक्षाही मोठे झाले आहे. २०१२ मध्ये जोशुआ यांच्या नेतृत्वात एक लाख लोकांनी हाँगकाँगमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम सक्तीचा करण्याविरोधात निदर्शने केली होती. १४ वर्षांचे असताना त्यांनी हाँगकाँग आणि मुख्यभूमीदरम्यान रेल लिंक प्रकल्प बनवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत निदर्शने केली. २०१८ मध्ये नोबेल शांती पुरस्कारासाठी जोशुआ यांना अमेरिकन काँग्रेसने नामांकन केले होते. ते २०१४ मध्ये टाइमच्या इन्फ्लुएशन टीन, २०१४ मध्ये पर्सन आॅफ द इयर रीडर्स पोलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते.  जोशुआला लहानपणी डिसलेक्सिया होता. वाचताना, लिहिताना अडचणी यायच्या, यामुळे आई - वडिलांनी अभ्यासावर जास्त लक्ष दिले नाही. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले जोशुआ वडिलांसोबत नियमितपणे चर्चमध्ये जात. तेथील चर्च ग्रुपमध्ये सहभागी होऊन त्यांनी बोलण्याची कला अवगत केली. जोशुआ म्हणतात की, हाँगकाँगचे बहुतांशी नेत्यांची बायबल राजकीय प्रेरणा आहे. मात्र, जोशुआ म्हणतात की, देवाच्या विचारांशी तुम्ही सहमत असाल हे प्रत्येकवेळी आवश्यक नाही. कुटुंब मध्यमवर्गीय होते. कुटुंबातील कोणाचाही राजकारणाशी दूरचाही संबंध नव्हता. जोशुआने शाळा, महाविद्यालयांमध्ये मागण्यांसाठी निदर्शने करणे, धरणे आंदोलन करणे आिण लोकांना एकत्र करणे सुरू केले होते. जेव्हा ते १६ वर्षाचे होते तेव्हा लोकशाहीच्या मागणीसाठी स्काॅलरिझम नावाचा गट स्थापन केला होता. नंतर १९ वर्षाच्या वयात आपला पक्ष डेमोसिस्टो स्थापन केला.  जन्म- १३ ऑक्टोबर १९९६  शिक्षण - राज्यशास्त्रात पदवी (हाँगकाँग मुक्त विद्यापीठ)  ट्विटर फॉलोअर्स- २,८८,७२८   चर्चेत का- जोशुआ आणि त्यांच्या पक्षाचे नेते या अभियानाचे नेतृत्व करीत आहेत.  जोशुआ वोंग यांनी वयाची २३ वर्षेही पूर्ण केली नाहीत. मात्र, हाँगकाँगमधील लाखो लोक त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या एकवटले आहेत.हाँगकाँगमध्ये त्यांच्या नेतृत्वात ३१ मार्चपासून लोक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन २०१४ मधील अंब्रेला चळवळीपेक्षाही मोठे झाले आहे. २०१२ मध्ये जोशुआ यांच्या नेतृत्वात एक लाख लोकांनी हाँगकाँगमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम सक्तीचा करण्याविरोधात निदर्शने केली होती. १४ वर्षांचे असताना त्यांनी हाँगकाँग आणि मुख्यभूमीदरम्यान रेल लिंक प्रकल्प बनवण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत निदर्शने केली. २०१८ मध्ये नोबेल शांती पुरस्कारासाठी जोशुआ यांना अमेरिकन काँग्रेसने नामांकन केले होते. ते २०१४ मध्ये टाइमच्या इन्फ्लुएशन टीन, २०१४ मध्ये पर्सन आॅफ द इयर रीडर्स पोलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते.  जोशुआला लहानपणी डिसलेक्सिया होता. वाचताना, लिहिताना अडचणी यायच्या, यामुळे आई - वडिलांनी अभ्यासावर जास्त लक्ष दिले नाही. ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेले जोशुआ वडिलांसोबत नियमितपणे चर्चमध्ये जात. तेथील चर्च ग्रुपमध्ये सहभागी होऊन त्यांनी बोलण्याची कला अवगत केली. जोशुआ म्हणतात की, हाँगकाँगचे बहुतांशी नेत्यांची बायबल राजकीय प्रेरणा आहे. मात्र, जोशुआ म्हणतात की, देवाच्या विचारांशी तुम्ही सहमत असाल हे प्रत्येकवेळी आवश्यक नाही. कुटुंब मध्यमवर्गीय होते. कुटुंबातील कोणाचाही राजकारणाशी दूरचाही संबंध नव्हता. जोशुआने शाळा, महाविद्यालयांमध्ये मागण्यांसाठी निदर्शने करणे, धरणे आंदोलन करणे आिण लोकांना एकत्र करणे सुरू केले होते. जेव्हा ते १६ वर्षाचे होते तेव्हा लोकशाहीच्या मागणीसाठी स्काॅलरिझम नावाचा गट स्थापन केला होता. नंतर १९ वर्षाच्या वयात आपला पक्ष डेमोसिस्टो स्थापन केला.

बातम्या आणखी आहेत...