आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : नाष्ट्याऐवजी दररोज पाणीपुरी, भेळ खाणे पडले महागात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - दररोज पाणीपुरी खाण्याची सवय एका मुलीला भलतीच महागात पडली. तिच्या खांदे, कोपर आणि मेंदूत गाठी तयार झाल्या आहेत. पाणीपुरीतील टिनियासोलियम कृमी (टेपवर्म) पीडित मुलीच्या शरीरात प्रवेश करून विकसित झाल्याने तिची अशी अवस्था झाली. दीड महिना उपचारानंतर सोनोग्राफी केल्यावर या आजाराचे निदान झाले. सोनोग्राफीचा अहवाल धक्कादायक होता. मेंदूत राहिलेल्या गाठीच्या डागामुळे आयुष्यभर अपस्माराचे झटके येण्याची शक्यता राहील. देशात १० हजारांत एका व्यक्तीत या आजाराची लक्षणे दिसतात.

डोकेदुखी आणि चक्कर येण्याची तक्रार : या मुलीवर उपचार करणारे वडोदऱ्याचे डॉ. हितेन कालेरिया यांनी सांगितले की, ही रुग्ण माझ्याकडे आली त्याच्या दीड महिना आधी तिच्यावर उपचार सुरू होते. तिला सतत डोकेदुखी, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवत होता. याशिवाय खांदा, कोपरावर मोठ्या गाठी होत्या. मी तपासले तेव्हा गाठी हलक्या लाल रंगाच्या होत्या. त्यामुळे मी ऑर्थोपेेडिक सर्जनला दाखवण्याचा सल्ला दिला. तिला ऑर्थोपेडिक सर्जनने पेनकिलर आणि मलम दिला, परंतु त्याने काही फरक पडला नाही.

सुरुवातीच्या निरीक्षणातून मला जाणवले की, हे कृमीशी संबंधित लक्षण आहे. म्हणून मी रुग्णाच्या हातावरीन गाठींची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीच्या अहवालात किसमिसच्या आकाराचा गुच्छ असल्यासारखखे दिसले. रक्त तपासणी अहवालात स्पष्ट झाले की या टिनियासोलियम कृमीच्या (टेपवर्म) अळ्या आहेत. अंडे ते कृमी विकसित होण्याच्या मधल्या अवस्थेत या अळ्या होत्या. एका गुच्छात दिसून आले की, याच्या आजूबाजूला असे एक कवच तयार झाले, ज्यामुळे जठरातील आम्लाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.

रुग्णाला संक्रमण कसे झाले हे खाण्यापिण्याच्या सवयींतून कळले : डॉ. म्हणाले की, मी रुग्णाला तिच्या खाण्यापिण्याच्या सवयींबाबत विचारले तेव्हा कळले की ती रोज पाणीपुरी आणि भेळ खाते आणि शुद्ध शाकाहारी आहे. म्हणजे मांसाहाराच्या माध्यमातून हा कृमी तिच्या शरीरात गेला नाही हे स्पष्ट झाले. मग वेळ न दवडता मेंदूचा एमआरआय केला. तो पॉझिटिव्ह आला. मेंदूतही गाठ आणि कृमीचे अंडे दिसले. त्वरित तिच्यावर उपचार सुरू केले. याची औषधी महाग नसते, पण रुग्णाला तिच्या वजनानुसार औषधाचा कोर्स घ्यावा लागतो. 
 

अशी आहेत न्यूरोसिस्टी सर्कोसिसची लक्षणे
> शरीरीत विविध जागी गाठी होतात.
> चालताना-फिरताना त्रास होतो.
> बारीक ताप येतो.
> अशक्तपणा आणि वजन कमी होते.
 

आता आहाराची काळजी घेईन :
या रुग्ण मुलीने आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, मी कॉलेजमध्ये शिकते. कुठेही नाष्टा, जेवण करत असे. या आजारातून सावरल्यावर निश्चय केला की, आता मी आहाराची पूर्ण काळजी घेईन.