आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DVM Special : जम्मू-काश्मीरमध्ये जमीन आणि कलम 370 वरील यू-ट्यूब गायिकांची गाणी हिट, 1.40 कोटींपर्यंत व्ह्यू 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ''तुम्ही पुलवामावर लिहिलेल्या गीतात म्हटले होते- 'अगर जरा भी दम रखते हो, तुम तोड दे धारा सत्तर को।' आज ती रद्द झाली आहे. मोदींनी तुमचे आणि भारतीयांचे म्हणणे ऐकले आहे.'' '' जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. खूपच छान आवाज आहे तुमचा.'' या काही प्रतिक्रिया गायिका कवी सिंह यांच्या 'धारा ३७०' या गीतावर आल्या आहेत. कवी सिंह यांनी कलम ३७० मध्ये मोदी सरकारने बदल केल्यानंतर हे गाणे यू-ट्यूबवर अपलोड केले होते. २१ वर्षीय कवी म्हणतात की, मी भक्ती आणि देशभक्ती यावरील गाणीच गाते. कवी यांचे गीत हे एक उदाहरण आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मध्ये बदल झाल्यानंतर आतापर्यंत हिंदी, हरियाणवी आणि भोजपुरी भाषेत तीन डझनपेक्षा जास्त गाणी आली आहेत. त्यात कलम ३७० रद्द केल्याचा आनंद आणि काश्मीरमध्ये जमीन खरेदीचे स्वातंत्र्य यावर भर देण्यात आला आहे. देशभक्तिपर गीत लिहिणारे गीतकार संगल प्रेम राजा म्हणाले की, 'कश्मीर है हमारा' हे गीत यू-ट्यूबवर हिट ठरले. आम्ही हे गाणे दुसऱ्याच दिवशी अपलोड केले होते. 


ही गाणी झाली आहेत खूप हिट 

गायिका : कवी सिंह 
गीत :
धारा ३७० 
हिंदी भाषेतील हे गाणे रोहतकची गायिका कवी सिंह हिने गायले आहे. त्याला आतापर्यंत १ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. तिने याआधी पुलवामा हल्ल्यावरही गाणे गायले आहे. तिच्या चॅनलचे २,२९,००० सबस्क्रायबर आहेत. 
व्ह्यू : १.४० कोटी 

- गायिका : काजल सिंह 

गीत : कश्मीर है हमारा 
व्ह्यू : ३७,९९,३७९ 
साई फिल्म्स रामकोलाद्वारे तयार केलेले हे गीत उत्तर प्रदेशच्या संगम प्रेम राजा यांनी लिहिले आहे. त्याआधी त्यांनी 'मोदी की सच्ची सरकार चाहिए' गीत रिलीज केले होते. ते एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी पाहिले होते.

- गायिका : पूजा श्रीवास्तव 

गीत: अब कश्मीर में तिरंगा लहराएगा 
व्ह्यू : २१,१०,११२ 
हे गीत दिनेश गोपाल यांनी लिहिले आहे. सोनोटेक नावाने तयार यू-ट्यूब चॅनलचे १.२ कोटी सबस्क्रायबर आहेत. त्यामुळेच हे गाणेही रात्रीतून यू-ट्यूबवर हिट राहिले. हे चॅनल हरियाणवी गीतही बनवते. 

बातम्या आणखी आहेत...