आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DVM Special : बारावीपर्यंत मराठी भाषा शिकणे अनिवार्य करावे... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून 'इयत्ता बारावीपर्यंत सर्व माध्यमांतून मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य केले पाहिजे,' अशी आग्रही मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आणि महाजनादेश यात्रेवर निघालेल्या मुख्यमंत्र्यांना 'मराठी भाषे'विषयीची ही कळकळ कशी आणि कितपत पोहाेचते, हा औत्सुक्याचा विषय आहे.

यासंदर्भात अरुणा ढेरे म्हणाल्या,alt148भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे. बहुसांस्कृतिकता ही बहुभाषेच्या आधाराने टिकते. विकसित होते. तेव्हा मराठी भाषिकता टिकवणे हे आजच्या महाराष्ट्राच्या आणि उद्याच्या विश्वव्यवस्थेच्या दृष्टीने कालसुसंगत असे आपले कर्तव्य आहे.

मराठी ही केवळ साहित्यभाषा म्हणून मर्यादित राहून चालणार नाही. ती संस्कारभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेचे आहे. मराठी प्रत्येकाला आली पाहिजे म्हणूनच ती शालेय अभ्यासक्रमात सर्व माध्यमांतून इयत्ता बारावीपर्यंत अनिवार्य करायला हवी,'.

ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून येण्यासाठी प्रमाणभूत साधने उपलब्ध व्हावीत
नवे ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून सुलभपणे येण्यासाठी तज्ञांकडून विश्वसनीय आणि प्रमाणभूत साधने उपलब्ध व्हावीत. ज्ञानभाषा म्हणून मराठीची वाढ झाली पाहिजे. सर्व ज्ञानविज्ञाने, कला, तत्त्वज्ञाने यांच्यातील संशोधन मराठीतून उपलब्ध झाले पाहिजे. मराठीविषयी संस्कृतसह सर्व भारतीय भाषांविषयी प्रत्येकाला जाणती आत्मीयता निर्माण होण्याची गरज आहे. महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेरच्या मराठी समूहांना भाषाज्ञानातून जोडून घेतले पाहिजे. त्यासाठी विविध उपक्रम तसेच योजना तज्ञांच्या साह्याने केल्या पाहिजेत.

वर्तमान मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी शासनाचा पुढाकार हवा
व्यापक लोकजागृती, लोकसहभाग आणि शासनाचा पुढाकार यातून वर्तमान मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी संवर्धनासाठी सकारात्मक घडण्याची आशा वाटते. मराठी भाषा टिकवणे, नवे ज्ञान देण्यास समर्थ बनवणे व तिचा अखिल भारतीय संस्कृतीशी दृढ संबंध प्रस्थापित करणे, ती विश्वसंस्कृतीत समृद्ध सहभागासाठी सक्षम होणे, यातून घडू शकेल. - डॉ. अरुणा ढेरे, अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
 

बातम्या आणखी आहेत...