आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special: Over 15 Million People In The Country Listen Songs To The App, Less Than 1% Of Paid Users

DvM Special : देशात १५ कोटींपेक्षा जास्त लोक अॅपवर ऐकतात गाणी, १ % पेक्षाही कमी पेड युजर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात ओटीटी म्युझिक प्लॅटफाॅर्मचे युजर्स वेगाने वाढत आहेत. भारतातही हा मोठा बाजार झाला आहे. ओटीटी म्युझिक प्लॅटफाॅर्म म्हणजे अॅपच्या मदतीने संगीत एेकतात. देशात सध्या त्याचे १५ कोटींपेक्षा जास्त युजर्स झाले आहेत. मात्र, पेड ग्राहकांची संख्या एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. जगभर संगीत वाढ आणि महसुलात डिजिटल म्युझिकचा वाटा वेगाने वाढला आहे. महसूल खूप कमी आहे हे मात्र खरे. १९९९ मध्ये एकूण जागतिक महसूल २५.२ अब्ज डाॅलर होता, तो डिजिटल आणि फ्री स्ट्रीमिंग आल्यानंतर २०१४ मध्ये घटून १४.२ अब्ज डाॅलरवर आला. त्यानंतर त्यात वाढीस सुरुवात झाली. इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ द फोनोग्राफिक इंडस्ट्रीनुसार, जागतिक महसूल २०१४ नंतर सतत वाढत आहे आणि २०१७ मध्ये तो १७.३ अब्ज डाॅलरवर गेला आहे. २०१८ मध्ये तो १९.१ अब्ज डाॅलर झाला आहे. जगभरात म्युझिक इंडस्ट्रीची सर्वाधिक कमाई स्ट्रीमिंग रिव्हेन्यूद्वारे होत आहे. एकूण महसुलात त्याचा वाटा २०१८ मध्ये ४६.८ टक्के राहिला आहे.  

अशी आहे देशभरातील सद्य:स्थिती
> 24.5% वाढून गेल्या वर्षी देशाची म्युझिक इंडस्ट्री १०६८ कोटींची झाली आहे. स्ट्रीमिंगद्वारे होणाऱ्या एकूण उत्पन्नात ३१% वाढ झाली आहे.

> 25.5 कोटी युजर्स होते २०१८ च्या शेवटी जगभरात जे पेड स्ट्रीमिंग सर्व्हिसची सुविधा घेत होते. जागतिक संगीत महसुलात त्याचा वाटा ३७% राहिला.
 
> 21.5 तास प्रति आठवडा भारतीय वेगवेगळ्या प्रकारचे संगीत एेकत आहेत. तर त्याची जागतिक सरासरी १७.८ तास प्रति आठवडा आहे.
 

पायरसीमुळे ५०-६०% महसूल घटला
म्युझिक ओटीटी मार्केट भलेही वेगाने वाढत असले तरी सर्वात मोठी समस्या पायरसीची आहे. एका अंदाजानुसार इंडस्ट्रीचे दरवर्षी पायरसीमुळे २५ कोटी डाॅलरचे नुकसान होत आहे. त्यामुळे महसुलात ५० ते ६०% घट होत आहे.
 

भाषेच्या आधारावर हिस्सा
> हिंदी : ४८ ते ५२%
> इंग्रजी : १७ ते १९%
> पंजाबी : १२ ते १४%
> तेलगू : ७ ते ८%
. तामिळ : ४ ते ५%
> इतर : ६ ते १०%