आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DVM Special : शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : शहरात पोलिसांकडून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असली तरी शाळेबाहेर जमणाऱ्या टोळक्यांकडून मुलींची छेडछेड केली जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. नुकताच सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू शाळे आणि वडाळा रोडवरील रहेनुमा शाळेच्या बाहेर मुलींना छेडण्याचा प्रकार उघडकीस आला. शालेय मुलींच्या छेडछाड संदर्भातील घटना रोखण्यासाठी शाळा प्रशासनासह शासनस्तरावर प्रभावी यंत्रणा नसल्यानेच अशा घटनेत वाढ होत असल्याचे समोर येत आहे.   शहरातील महाविद्यालय व शाळा परिसरात मुलींना छेडण्याचे प्रमाण अलीकडे वाढत चालले आहे. टवाळखोर युवक शाळा, महाविद्यालय भरताना व सुटण्याच्या दरम्यान परिसरात उभे राहून मुलींची छेड काढत असतात.नुकताच अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला कारमध्ये बसवित पळविण्याची धक्कादायक घटना मदिना चौक येथे नुकताच घडली. या वाढत्या घटनांविषयी समाजात अधिक जनजागृती करण्याची गरज आहे. या जनजागृती करण्यासाठी पोलिस प्रशासनासह समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे येण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला अाहे. यामुळे महिलांसह शाळेकरी मुलांकरीता सुरक्षतेसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मुलींची छेडछाड रोखण्यासाठी पोलिसांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाची गस्त महाविद्यालय, शाळा भरताना व सुटताना केली जात असली तरी त्याचा फायदा होतांना दिसत नाहीये. तसेच या परिसरात आढळणाऱ्या टवाळखोर युवकांवर कारवाई करावी. तसेच मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिस हेल्पलाईन नंबर उपलब्ध करण्याची मागणी पालकांसह नागरिकांकडून केली जात आहे.    टवाळखोरांची गर्दी, पोलिसांचे दुर्लक्ष  शाळा, महाविद्यालय किंवा क्लाससाठी विद्यार्थी घराबाहेर पडल्यावर तो घरी येईपर्यंत पालकांच्या जीवाला घोर लागलेला असतो. शहरातील कॉलेजरोडसह काही भागात मोठ्या प्रमाणात शाळा, व महाविद्यालय असून या रस्त्यावर नेहमीच खूप वर्दळ असते. त्यातच शाळा, महाविद्यालय भरण्याचा आणि सुटण्याची वेळ एकच आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे याचा फायदा काही टवाळखोरांकडून घेतला जातो आणि ते याच वेळी याठिकाणी गर्दी करत असल्याचे काही पालकांनी सांगितले.    सारडा सर्कल परिसरात 'रोडरोमिओं'ची दहशत  शहरातील सारडा सर्कल परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतो. शाळेत गेलेला आपला चिमुकला सुखरूप परत येईपर्यंत पालकांच्या मनात चिंतेचे ढग दाटलेले असतात. सारडा सर्कल परिसरात अवजड वाहतूक, बेशिस्त पार्किंग आणि प्रशासनाचे दुर्लक्ष ही याची प्रमुख कारणे आहेत. शालेय मुलींनाही रोडरोमिओंचा जाच आहे. याठिकाणी शाळा, महाविद्यालय भरण्याचा आणि सुटण्याची वेळी मोठ्या प्रमाणावर 'रोडरोमिओं'चा वावर असतो. याकडे ही पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.   

बातम्या आणखी आहेत...