आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special | Shreya Kandhare From Pune Has Been Selected In The Indian Squad For The Asian Yoga Tournament

DvM Special : लवचिक शरीरयष्टी, चपळाईमुळे काेचचा सल्ला; याेगात कबड्डीसाेडून करिअर, जागतिक स्तरावर उमटवला ठसा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रचंड लवचिक शरीरयष्टी, चुरशीची चपळता आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या बळावर याेगपटू श्रेया कंधारेला जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. कबड्डीच्या प्रशिक्षणासाठी मैदानावर उतरलेल्या या प्रतिभावंत खेळाडूमधील ही शैली प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे यांनी हेरली. त्यांनी तिला याेगामध्ये करिअरचा सल्ला दिला. श्रेयाने अल्पावधीत आपल्या  तल्लखतेतून या खेळात उल्लेखनिय कामगिरी केली.  यातूनच तिला आता आशियाई स्पोर्ट्स योगा स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपला प्रवेश निश्चित करता आला. ही आशियाई स्पर्धा दक्षिण काेरियात ५ ते ८ सप्टेंबरदरम्यान हाेणार आहे. चाैथ्यांदा आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरलेली  श्रेया ही महाराष्ट्राची पहिली महिला याेगपटू ठरली.
 

चाैथ्यांदा स्पर्धेस पात्र; ठरली पहिली महिला
श्रेया कंधारेने चाैथ्यांदा आशियाई याेगा स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला. अशा  प्रकारे सलग चाैथ्यांदा या स्पर्धेसाठी पात्र  ठरलेली श्रेया ही महाराष्ट्राची पहिलीच याेगपटू ठरली. आपल्या अव्वल आणि उल्लेखनिय कामगिरीच्या बळावर श्रेयाला या  स्पर्धेतील आपला दबदबाही सातत्याने कायम ठेवता आली. तिने सिंगापूर येथील स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली हाेत.

श्रेयाने अल्पावधीत गाठला अव्वल कामगिरीचा पल्ला
> २०१८ मध्ये अर्जेटिनात  जागतिक स्पोर्ट्स योगा स्पर्धेत रौप्यपदक
> २०१४ मध्ये मलेशियातील आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स योगा स्पर्धेत कांस्यपदक.
> २०१४ ते २०१७ सलग ३ वर्षे राष्ट्रीय योगा स्पर्धेत सुवर्ण पटकावलेे
> रांची येथे योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या योगा स्पर्धेत रौप्यपदक
 

११ व्या वर्षी प्रशिक्षण; ६ वर्षात अव्वल कामगिरी
श्रेया कंधारेला वयाच्या ११ व्या वर्षी याेगाचे प्रशिक्षण मिळाले. काेच पांगारे यांनी तिला तंत्रशुद्ध पद्धतीने काेचिंग केले. याच्या बळावर श्रेयाला अवघ्या सहा वर्षांतील प्रशिक्षणातून जागतिक स्तरावर आपली वेगळी आेळख निर्माण करता आली. तिचे हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरते.