आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

DVM Special : टीसीमध्ये 'त'चा झाला 'थ' आणि आदिवासी युवकाला गमवावी लागली सीआयएसएफची नोकरी, दिवसरात्र सोसली फरपट 

एका वर्षापूर्वीलेखक: विठ्ठल सुतार
  • कॉपी लिंक

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील रहिवासी असलेला आदिवासी युवक गणेश तोटा याला सीआयएसएफची (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा मंडळ) नोकरी गमवावी लागली. कारण काय, तर त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात नमूद आडनावामध्ये alt147त' अक्षराऐवजी alt147थ' पडले आणि ते तोटाऐवजी थोटा झाले. त्याच्या आधार आणि पदवी प्रमाणपत्रात आडनाव तोटा असूनही सीआयएसएफने त्याला नोकरी देण्यास नकार दिला.  २८ वर्षीय गणेश तोटा याची १२वी शैक्षणिक पात्रतेच्या आधारे सीआयएसएफमध्ये निवड झाली होती. मात्र, मुंबईत सीआयएसएफ कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी झाली तेव्हा कागदपत्रांवरील वेगवेगळे आडनाव लक्षात आले. त्यानंतर गणेशला नाव बदलण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली. या काळात गणेश दहा दिवस शपथ पत्र आणि राजपत्राची प्रत घेऊन सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजवत होता. शाळेत चौकशी केली तेव्हा सांगण्यात आले की, आता बारावी बोर्डच त्या नावात बदल करू शकेल. बोर्डाकडे चौकशी केली तर, त्यांनी शाळेकडून प्रस्ताव येऊ द्या, असे सांगितले. या पळापळीत मुदत संपून गेली आणि नोकरी हुकली.  प्रकरण काय? : गणेश तोटा याने सीआयएसएफची भरती परीक्षा उत्तीर्ण केल्यावर ऑफर लेटरही आले. कागदपत्र पडताळणीसाठी त्याला ६ जुलैला मुंबईत बोलावण्यात आले. तेथे पदवी आणि आधार कार्डवर तोटा असे आडनाव होते. तर, १०वी आणि १२वीच्या गुणपत्रिकेसह शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आडनाव होते थोटा.  आता मी कुठे दाद मागायची...  मी राजपत्रातही आडनावात बदल केला होता. मात्र, याला ना सीआयएसएफने मंजुरी दिली, ना महाराष्ट्र शिक्षण मंडळाने. शाळेत गेलो तर त्यांनी बोर्डात पाठवले. बोर्डात गेलो तर त्यांनी पुन्हा शाळेकडे बोट दाखवले. जिल्हा, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही भेटलो. आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या. प्रयत्न फोल ठरले. आता मी या परिस्थितीत कुणाकडे दाद मागायची. - गणेश तोटा   

0