आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special: The Country's First Def Startup; Two Women Established Academy For Providing Technical Education To Deaf People

DvM Special : देशातील पहिले डीफ स्टार्टअप; मूकबधिरांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी दोन महिलांनी उभारली अकादमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोची - मूकबधिर लोकांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी दोन मूकबधिर मुलींनी एक अकादमी स्थापन केली असून “डिजिटल आर्ट््स अकॅडमी फॉर डीफ’ (डीएएडी) या नावाने नोंदणी झालेली ही कंपनी मूकबधिरांची पहिली स्टार्टअप ठरली आहे. देशात सध्या १.८ कोटी मूकबधिर असून यातील बहुतांश लाेकांचे वय ३० हून कमी आहे. दुर्दैवाने अशा लोकांना तांत्रिक शिक्षण देण्यासाठी आजवर काेणतेही साधन उपलब्ध नाही. 

दरम्यान, डीएएडीच्या संस्थापक रेम्या राज आणि सुलू नौशाद यांनी या महिन्यात कोची येथे झालेल्या महिला स्टार्टअप परिषदेत सहभाग घेतला. यात दोघींनी मूकबधिरांसाठी असलेल्या सांकेतिक भाषेतच दुभाषामार्फत सादरीकरण केले. रेम्या यांच्यानुसार, त्यांची कंपनी आयटीसंबंधी विषयावर वेबसाइट आणि अॅपमार्फत व्हिडिओ क्लास चालवते. या सर्व क्लासमध्ये भारतीय साइन लॅँग्वेज वापरली जाते. हा अभ्यासक्रम बारावी उत्तीर्ण विद्यार्थी करू शकतात. यातील बहुतांश अभ्यासक्रम रोजगाराभिमुख आहेत. अॅनिमेशन आणि डिझायनिंगच्या कोर्ससाठी या दोघी सध्या अॅडॉब कंपनीशी चर्चा करत आहेत. रेम्या यांच्यानुसार, देशातील १.८ कोटी बधिर लोकांसाठी केवळ २५० नोंदणीकृत दुभाषी आहेत. सुलू यांच्यानुसार, त्या स्वत: मूकबधिर असल्याने इतरांच्या अडचणी समजून घेणे सोपे जाते. मूकबधिर लोक कोणत्याच क्षेत्रात मागे राहू नयेत असे त्यांना वाटते. सध्याचे डिजिटल विश्व मूकबधिरांना पूरक ठरणारे नाही. ते या लोकांसाठी डीफ फ्रेंडली व्हावे म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. डीएएडीच्या दोन्ही संस्थापिका उच्चशिक्षित आहेत. तिरुवानंतपुरमच्या रेम्या यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर आयटी क्षेत्रात अॅनालिस्ट म्हणून काम केले आहे, तर सुलू यांनी बीकॉमनंतर एमबीए केले आहे. 
 

बँकिंग, प्रवासासंबंधी तांत्रिक अभ्यासक्रमांचा केला समावेश
तंत्रज्ञानाचा वापर आणि ते समजून घेणे मूक-बधिर लोकांसाठी अत्यंत कठीण आहे. त्यामुळे प्रवास, बँकिंगसारख्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानाचे व्हिडिओ ट्युटोरियल दोघींनी तयार केले. यातील बहुतांश ट्युटोरियल मोफत असून काही अभ्यासक्रमांची फी घेतली जाते.