आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DVM Special : निवडणूक आचारसंहिता जारी होण्यापूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शनिवारी मराठवाड्यातील १७ उपजिल्हाधिकारी तसेच १५ तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले. त्यात अनेक अधिकारी आपल्या सोयीच्या ठिकाणी रवाना झाल्याचे दिसते. एक महिन्यापूर्वी नाशिक येथून विभागीय आयुक्तालयात महसूल उपायुक्त म्हणून रुजू झालेले सतीश खडके लगेच मुंबईला रवाना झाले. निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले नीलेश श्रींगी यांची नाशिकला बदली झाली. त्यांच्या पत्नी तेथे पोलिस उपायुक्त आहेत. तर त्यांच्या जागी पांडुरंग कुलकर्णी हे रुजू झाले. ते यापूर्वी औरंगाबादेत तहसीलदार तसेच उपजिल्हाधिकारी होते. पाच वर्षांपूर्वी येथे तहसीलदार असलेले किशोर देशमुख पुन्हा शहराचे तहसीलदार म्हणून आले आहेत. औरंगाबादचे अप्पर तहसीलदार रमेश मुनलोड यांची बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे बदली झाली आहे. औरंगाबाद महसूल उपायुक्तपदावर पराग सोमण अाले अाहेत. औरंगाबादचे जिल्हा पुरवठा अधिकारी भारत कदम यांची बदली सिडकोचे प्रशासक तर महसूल प्रबोधिनीचे संचालक एस. पी. सावरगावकर हे प्रबंधक, मराठवाडा प्रशासकीय प्रबोधिनी असतील. विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मृणालिनी निंबाळकर यांची बदली उपजिल्हा निवडणुक अधिकारी पुणे येथे करण्यात आली. औसा, रेणापूरचे उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते यांची उपविभागीय अधिकारी कन्नड, उपविभागीय अधिकारी लातूर रामेश्वर रोडगे यांची उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद, निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड संतोष वेणीकर यांची विषेश भूसंपादन अधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी, धर्माबाद सचिन खल्लाळ यांची निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड, नांदेड येथील उपजिल्हाधिकारी (राेहयाे) अनुराधा ढालकरी यांची हिंगोली येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी कमलाकर फड यांची उस्मानाबाद येथे विशेष भूसंपादन येथे झाली. परतूरचे उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांची सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारीपदी, हिंगोलीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भाऊसाहेब जाधव यांची परतूर येथे उपविभागीय अधिकारी तसेच जालनाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर यांची बदली हिंगोली येथे त्याच पदावर झाली आहे. औरंगाबादच्या जिल्हा पुनर्वसन अधिकारी अंजली धानोरकर यांची बदली जालना येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी, परभणी येथील उपजिल्हा निवडणूक अधिकारी महादेव किरवले यांची बदली जिल्हा पुरवठा अधिकारीपदी औरंगाबाद येथे झाली आहे. उदगीरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांची उपजिल्हा निवडणूक अधिकारीपदी, चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) माधव निलावाड यांची विषेश उपजिल्हाधिकारी, वनजमाबंदी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. औरंगाबादचे तहसीलदार सतीश सोनी यांची उस्मानाबाद येथे बदली. विभागीय आयुक्त कार्यालयातील तहसीलदार महेश परांडेकर यांची लातूर जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तलयातील न. पा. प्रशासनाचे तहसीलदार अरुण पावडे यांची याच कार्यालयात महसूल विभागात, धर्माबादच्या तहसीलदार ज्योती चव्हाण यांची पालम तहसीलदार, नियुक्तीच्या प्रतीक्षेतील तेजस्विनी जाधव यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील पल्लवी टेमकरना पूर्णा तहसीलदार, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील आर, व्ही. शिंदे यांची जालना येथे तहसीलदार (संजय गांधी नि.यो.), नियुक्तीच्या प्रतीक्षेतील अश्विनी डमरे यांची सामान्य प्रशासन विभाग औरंगाबाद, सिडकोतील सुवर्णा पवार यांची जाफराबाद तहसीलदारपदी, बीड येथील तहसीलदार अविनाश शिंगटे यांची गंगापूर तहसीलदारपदी, नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर बीड तहसीलदारपदी, गंगापूरचे अरुण जऱ्हाड नांदेडचे तर हदगावच्या वंदना निकुंभ यांची परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची आधीच फिल्डिंग
निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी बदल्या होणार याची कल्पना असल्याने या अधिकारी मंडळींनी व्यवस्थित फिल्डिंग लावली होती. त्याचा फायदा काहींना झाला तर काहींनी दूरच्या ठिकाणी जावे लागल्याचे दिसते. अर्थात ही पहिली यादी असून येत्या ८ दिवसांत आणखी बदल्यांचे आदेश जारी होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. गत निवडणुकीत जे अधिकारी ज्या जिल्ह्यात होते तेथून त्यांची बदली होणार हे नक्की असून ही यादी मोठी आहे. किमान ५० महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश येत्या काही दिवसांत जारी होतील, असे सांगण्यात येत आहे.