आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफराह स्टॉकमॅन / वॉशिंग्टन : शाळा, महाविद्यालयांमध्ये फसवणूक करणाऱ्या सिंडिकेटसंदर्भात तर तुम्ही चांगलेच एेकले असेल. मात्र, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये याला फसवणूक नाही तर सामान्य कामाप्रमाणे बघितले जाते. हे काम जागतिक पातळीवर पोहचले आहे. अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थी देशाबाहेरून आपल्या असाइनमेंट करवून घेताहेत. यात संघर्ष करणाऱ्या लेखकांची मदत घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या असाइनमेंट तर हाेतातच, लेखकांनाही रोजगार मिळत आहे. हे लेखक केनिया, भारत व युक्रेनसारख्या देशात बसून विद्यार्थ्यांना मदत करतात. असेच एक उदाहरण केनियातील न्येरी विद्यापीठात शिकणाऱ्या मॅरी बुगुआ हिचे आहे. ती अमेरिकी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करते. मॅरीने खर्च भागवण्यासाठी अनेक कामे केली आहेत. मात्र, तेवढ्याने तिचा खर्च भागत नव्हता. तिच्या मित्राने अकॅडॅमिक रायटिंग करण्याचे सुचवले. अकॅडॅमिक रायटिंग केनियात एक उद्योग म्हणून वाढत चालला आहे. हा उद्योग अमेरिका, इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्कूल असाइनमेंट बनवत आहे. मॅरी यात सहभागी झाली तेव्हा तिला फसवणुकीसारखे वाटले. मात्र, मॅरीकडे कमाईचा दुसरा पर्याय नव्हता. मॅरी सध्या एसमाय होमवर्क व ऐसेशार्कसारख्या साइट्ससोबत जोडली गेली आहे. हा व्यवसाय एक दशकाहून अधिक काळापासून अस्तित्वात असला तरी सध्या त्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
एका पानासाठी ११०० रु., तातडीचे ३ हजारांपर्यंत मिळतात
या कामातील लोकांचे उत्पन्नही कमी नाही. एका कामात एका पानासाठी सुमारे ११०० रुपये मिळतात. ते दोन आठवड्यात पूर्ण करायचे असते. असाइनमेंट लवकर पाहिजे असल्यास एका पानाचे ३००० रुपयांपर्यंत मिळतात. केनियात वार्षिक उत्पन्न १.२ लाख रुपये आहे, यशस्वी लेखक वर्षभरात १.४ लाख रुपये कमावतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.