आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DvM Special: Women Should Use Cloth Bags; Fashion May Seem Old, But The Earth Will Be Plastic free: Amit Shah

DvM Special : महिलांनी १० वर्षे टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करावा; फॅशन जुनाट वाटेल, मात्र पृथ्वी प्लास्टिकमुक्त हाेईल : शहा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकार पर्यावरण रक्षणासाठी एकदा वापराचे प्लास्टिक उत्पादन राेखण्याचे अभियान राबवण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये गुरुवारी खरेदीसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करण्याचे आवाहन महिलांना केले. त्याएेवजी दीर्घकाळ टिकणाऱ्या कापडी पिशव्यांचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला. अशा पिशव्या १० वर्षांपर्यंत चालतील. या पिशव्या वागवणे जुनाट फॅशन वाटेल, मात्र यामुळे प्लास्टिक प्रदूषणापासून पृथ्वीचे रक्षण करण्यास मदत हाेईल. दुसरीकडे, एअर इंडिया व रेल्वेनेही सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर २ आॅक्टाेबरपासून बंद घालण्याची घाेषणा केली आहे. एअर इंडियाची सीएमडी अश्वनी लाेहानी म्हणाले, सर्व उड्डाणांमध्ये आता लाकडी प्लेटमध्ये जेवण दिले जाईल. प्रवाशांना आता २०० मिली बाटलीत पाणी दिले जाते, मात्र आता एअर हाेस्टेसला १५०० मिलीच्या बाटल्या दिल्या जातील. यातून कागदी ग्लासात प्रवाशांना पाणी दिले जाईल. विस्तारा एअरलाइन्सनेही दिल्ली-मुंबई विमानात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या बंद केल्या आहेत.

एअर इंडिया पेपर प्लेटमध्ये देणार सँडविच
> प्लास्टिकमध्ये बंद सँडविच व चिप्स बटर पेपरमध्ये दिले जाईल. चहालाही पेपर कप असतील. 
> मफीनच्या ऐवजी केक स्लाईस दिल्या जातील. त्या पुठ्ठ्यापासून तयार स्नॅक्स बॉक्समध्ये मिळतील.
> प्रवाशांना भोजनही लाकडाच्या प्लेटमध्ये पॅक करून मिळतील.
> क्रू सदस्यांना प्लास्टिकऐवजी हलक्या स्टीलच्या प्लेटमध्ये भोजन दिले जाणार आहे. 
> छोट्या बाटल्या बंद करून मोठ्या बाटल्यांत पाणी मिळेल. 
 

१५ रेल्वेंमध्ये आता प्लास्टिकवर बंदी
आयआरसीटीसीचे पीआरओ सिद्धार्थ म्हणाले, प्लास्टिक वापर पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना सर्व परवानाधारक व्हेंडर्सना दिल्या आहेत. हा नियम मोडला तर दंड आकारला जाईल. सध्या १५ रेल्वेंमध्ये इको फ्रेंडली म्हणजे बायोडिग्रेडेबल कॅसरॉल (प्लेट, वाटी, चमचे इत्यादी.) वापर सुरू झाला आहे. हळूहळू अशा रेल्वेंची संख्या वाढवण्यात येणार आहे. यात राजधानी, शताब्दी, दुरंतोंचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...