आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवपुरी/ भोपाळ - मध्य प्रदेशातील शिवपुरीचा २४ वर्षीय रामेश्वर गुर्जर दोन दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत आहे. याचे कारण म्हणजे एका व्हिडिओत तो रस्त्यावर अनवाणी पायाने धावताना दिसतो आहे. शिवाय १०० मीटर अंतर तो केवळ ११ सेकंदातच पूर्ण करतो. याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे १०० मीटर धावण्याचा राष्ट्रीय विक्रम १०.३० सेकंदांचा आहे. तो अनिल कुमार याच्या नावे आहे. याचा अर्थ जो तरुण अनवाणी पायाने कोणत्याही प्रशिक्षणाविना हे अंतर ११ सेकंदात कापू शकत असेल तर प्रशिक्षणानंतर संपूर्ण रनिंग किटने तो यात २-३ सेकंदांची सुधारणा करू शकेल. असे घडलेच तर हा रामेश्वर उसेन बोल्टपेक्षाही वेगवान ठरू शकतो. कारण, बोल्टच्या नावे ९.५८ सेकंदांचा विश्वविक्रम आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होताच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी तो शेअर करून केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना टॅग केला आणि दिल्लीपासून भोपाळपर्यंत अख्खी सरकार यंत्रणा रामेश्वरच्या शोधार्थ निघाली. रिजिजू यांनीही व्हिडिओ पाहून ट्विट केले की, “कोणीतरी या तरुणाला माझ्याकडे आणा... मी याच्या प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करतो.’ मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री जितू पटवारी यांना हे कळताच त्यांनी एका क्रीडा अधिकाऱ्याला रामेश्वरच्या गावी पाठवले. तो अधिकारी शनिवारी रामेश्वरला भोपाळमधील राज्य क्रीडा अकादमीत घेऊन आला. टीटीनगर स्टेडियमवर त्याला धावण्यास सांगण्यात आले. मात्र, आपण खूप थकलो असल्याचे सांगून त्याने विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे आता सोमवारी त्याच्या क्षमतेची चाचणी होईल. इतर धावपटूंसोबत त्याला धावावे लागेल. मप्र सरकारी अकादमीतील धावपटू सध्या एवढ्या अंतरासाठी ११.३० सेकंदांपर्यंत वेळ घेतात.
मी ५०० रुपयांच्या बक्षिसासाठी धावलो... व्हिडिओ व्हायरल झाला
भोपाळमध्ये रामेश्वरने सांगितले, की हा व्हिडिओ १२ ऑगस्टचा आहे. गावात एक स्पर्धा होती. यात ५०० रुपये बक्षीस होते. सध्या मी लष्कर किंवा पोलिसांत जाण्यासाठी तयारी करत आहे. त्यामुळे रोज ५ किमी धावतो. बक्षिसासाठी स्पर्धेत धावलो आणि जिंकलो. आज मी चक्क अकादमीत आहे. सोमवारी आता चाचणी देईन.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.