आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय 55 वर्षे, उंची 4 फूट 4 इंच आणि गर्लफ्रेंड 6 फूट 3 इंचांची.. अजबच आहे या बॉडी बिल्डरची Life

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लोरिडा - 55 साल वर्षांचा अँटन क्राफ्ट जागतिक दर्जाचा बॉडीबिल्डर आहे. आपल्या वजनापेक्षा चारपट अधिक वजन तो उचलतो. त्यांची उंची केवळ चार फूट चार इंच आहे. म्हणजेच तो बुटका आहे. फ्लोरिडाचा राहणारा हा बॉडी बिल्डर सध्या 230 किलोग्रामपर्यंत वजन उचलतो. हा एक विश्वविक्रमच आहे. अँटन महिलांच्या बाबतीतही बराच आशावादी आहे. तो नेहमी उंच मुलींनाच डेट करतो. सध्याची त्याची गर्लफ्रेंड तर सहा फूट उंच आहे. 


अँटन सध्या चायना बेल हिच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये आहे. 43 वर्षीय चायना पूर्वी एक मुलगा होती. त्यानंतर ती मुलगी बनली. अँटनने जेव्हा तिला डेटबाबत विचारले तेव्हा तिला काही लक्षातच आले नाही. पण त्याच्या वेटलिफ्टींग्चाय कौशल्याबाबत समजले तेव्हा तो आवडू लागला असे चायनाने सांगितले. अँटनकडे वर्ल्ड हेविवेट टाइटलसह बरेच काही असल्याचे तो म्हणाला. मला बुटक्या मुलाला डेट करायची इच्छा नव्हती. पण या व्यक्तीला भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की तो अत्यंत वेगळा आहे. तशीच मीही वेगळी आहे, असे चायना म्हणाली. तर मैत्रिणीमुळे अधिक वजन उचलण्याची प्रेरणा मिळते असे अँटन सांगतो. 


पाच वेळा झाला आहे मृत्यू 
अँटनने दावा केला की, पॉवर लिफ्टींगच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्वात अधिक बेंचप्रेसचा विक्रम केला आहे. तांत्रिकदृष्ट्या मला पाच वेळा मृत घोषित करण्यात आले. पण मी वाचलो. मी वेट लिफ्टींग बंद केली नाही तर मला हार्ट अटॅक येऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण माझ्यावर त्याचा परिणाम झाला नाही, असे अँटन म्हणतो. 


अँटन म्हणतो, विजेता केवळ एकच असतो. दुसरा केवळ पराभूत खेळाडू असतो. त्याची कोणीही दखल घेत नाही. मी जगातील पाच शक्तीशाली व्यक्तींपैकी एक आहे. माझ्या वजनापेक्षा चारपट अधिक वजन मी उचलतो असे तो म्हणाला. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, अँटन आणि चायना बेलचे PHOTO 

बातम्या आणखी आहेत...