आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडिजचा चॅम्पियन ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास, म्हणाला-तरुणांना संधी देण्याची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - वेस्ट इंडीज क्रिकेट टीममधील स्टार ऑलराउंडर ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. ब्राव्होने जवळपास 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. ब्राव्हो गेल्या अनेक दिवसांपासून विंडिजच्या टीममधून बाहेर होता. त्यानंतर त्याने आता तरुणांना संधी देण्याची वेळ असल्याचे सांगत ब्राव्होने निवृत्तीची घोषणा केली आहे. 


ड्वेन ब्राव्होने 2004 साली इंग्लंडच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ब्राव्हो विंडिजच्या सर्वात महान खेळाडुंपैकी एक समजला जातो. त्याने विंडिजसाठी अनेकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तसेच गेल्या काही वर्षात तर तो टी ट्वेंटीचा स्पेशालिस्ट बनला आहे. पण काही महिन्यांपासून तो विंडिजच्या टीममधून बाहेर होता. काही दिवसांपूर्वीच विंडिजने ज्या 25 खेळाडुंची यादी जारी केली होती, त्यात ब्राव्होचे नाव नव्हते. त्यानंतरच ब्राव्होने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजतेय. 


काय म्हणाला ब्राव्हो... 
ब्राव्होने म्हटले की आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी निवृत्ती जाहीर करत आहे. ब्राव्हो पुढे म्हणाला की, मला आजही 14 वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवतो जेव्हा मी वेस्ट इंडिजसाठी टेस्ट मॅच डेब्यू केला होता. लॉर्ड्सच्या मैदानावर मी पहिल्यांदा टेस्ट कॅप परिधान करून मैदानावर उतरलो होतो. माझ्यातील क्रिकेटसाठीचा उत्साह अद्याप कमी झालेला नाही आणि हा उत्साह कधी कमीही होणार नाही. सगळे जे करतात तेच मला आता करायचे आले. तरुणांना संधी द्यायची आहे, त्यासाठी मी संन्यास घेत आहे. 


अशी राहिली कारकिर्द 
35 वर्षांच्या ब्राव्होने वेस्ट इंडिजसाठी 40 टेस्ट मॅचमध्ये 2,200 रन करत 86 विकेट मिळवल्या आहेत. तर 164 वनडे मॅचमध्ये 2,968 रन आणि 199 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय 66 टी 20 मॅचमध्ये 1,142 रन आणि 52 विकेट घेतल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...