आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक... हरित वायूंचा वापर करून इंधनाची निर्मिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरित वायूंचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने टेक्सासमधील राइस विद्यापीठाने एक महत्त्वाचा शोध लावला आहे. यामुळे हे वायू पुन्हा वापरले जाऊन त्याचे द्रवरूपी इंधनात रूपांतर होऊ शकेल. यासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रोलायझर पूर्णपणे रिन्युएबल विजेवरच काम करेल. विद्यापीठात विकसित कॅटलिक रिअॅक्टर हे कार्बन डायआॅक्साइडचा वापर करून त्याचे सघन फाॅर्मिक अॅसिडमध्ये रूपांतर करेल. राइस विद्यापीठातील केमिकल व बायोमाॅलिक्युलर इंजिनिअर हाओटिआन वांग यांनी सांगितले की, आतापर्यंत तयार होणारे फाॅर्मिक अॅसिड स्वच्छ करण्याची पद्धत खूप महागडी होती. यात खूप ऊर्जा खर्च होत असे. पण आता कार्बन डायआॅक्साइडचे शुद्ध व सघन फाॅर्मिकमध्ये रूपांतर करण्याची ही पद्धत व्यावसायिक पातळीवर अमलात आणली जाऊ शकेल. हरितगृह वायूंपासून उपयुक्त वस्तू बनवण्यावर वांग आणि त्यांचा समूह अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्यांनी सांगितले की, फाॅर्मिक अॅसिड इंधन स्वरूपात वापरून त्यापासून वीजनिर्मिती करता येतेे. यापासून निर्माण झालेल्या कार्बन डायआॅक्साइडपासून पुन्हा फाॅर्मिक अॅसिड तयार करता येईल. फाॅर्मिक अॅसिडर केमिकल इंडस्ट्रीत इतर रसायनांच्या फीडस्टाॅकसाठीही वापरले जाऊ शकते. तसेच हायड्रोजनसाठी स्टोअरेज मटेरियल म्हणूनही याचा वापर होतो. उदा. फाॅर्मिक अॅसिडमध्ये स्टोअर केलेल्या एक घनमीटर हायड्रोजनमध्ये सामान्य प्रमाणातील हायड्रोजनच्या तुलनेत एक हजार पट जास्त ऊर्जा असते. हायड्रोजन कॉम्प्रेस करणे खूप कठीण असते. पण या पद्धतीमुळे हायड्रोजनमधून जास्तीत जास्त ऊर्जा मिळू शकेल. हायड्रोजनवरील कारसाठी हे उपयुक्त ठरेल. sciencedaily.com  

बातम्या आणखी आहेत...