आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यूचुअल फंड / डायनॅमिक फंडद्वारे दिर्घ-मुदतीमध्ये मिळेल चांगला रिटर्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस न्यूज- शेअर बाजारात शॉर्ट टर्ममध्ये चढ-उताराची स्थिती नेहमीच पाहायला मिळते. पण आपण दिर्घ-मुदतीमध्ये गुंतवणूक करत असाल तर आपल्या शेअरद्वारे चांगला रिटर्न मिळतो. त्यामुळे कोणत्याही गुंतवणूकदाराच्या पोर्टफिलीओमध्ये एक विशेष स्थान असते. सध्या देशातील शेअर बाजारात पुन्हा एकदा चढ-उताराची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच आज लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार असून या निकालावर सर्वाचेच लक्ष लागून आहे. पण दिर्घ-मुदतीमध्ये शेअर बाजाराचे प्रदर्शन मुलभूत घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये कंपन्यांची उत्पन्न, मार्केट व्हल्यूऐशन, इकॉनॉमिक ग्रोथ इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त अमेरिका-चीन ट्रेड वॉर, तेलांचे दर इत्यादी असे घटक आहेत जे जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीवर परिणाम करू शकतात.


निवडणूकांचे निकालाकडे पाहता, अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे की, बाजारात मोठ्या प्रमाणात असलेला चढ-उतार किती काळ टिकेल? सध्याच्या काळात गुंतवणूकीची योग्य योजना काय असली पाहिजे? गुंतवणूकदारांनी डायनॅमिक इक्विटी फंडचा पर्याय निवडला पाहिजे का? कोणत्याही इतर श्रेणीच्या निधीतून किती चांगले किंवा धोकादायक आहे? या सर्व गोष्टीवर एक चांगला पर्याय म्हणजे सर्व गुंतवणूकदारांनी दिर्घकालीन मुदतीमध्ये शेअर गुंतवणूक करावी. बाजारमध्ये शॉर्ट टर्ममध्ये दिसणारे चढ-उतारां ऐवजी गुंतवणूकीच्या पोर्टफोलियोतील अॅसेट अॅलोकेशनवर लक्ष ठेवले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे शेअरमध्ये दिर्घ मुदतीसाठी रिटर्न मार्केट व्हॅल्युएशन आणि कंपन्यांच्या उत्पन्नावर परतावा मिळतो. तसेच शॉर्ट टर्ममुळे बाजारातील चढ-उतार दिर्घ-मुदत गुंतवणूक प्रभावित होत नाही.

 

सध्याच्या परिस्थितीमध्ये गुंतवणूकदार डायनॅमिक फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. हा निधी बाजारातील चढ-उतारांचा फायदा घेण्यासाठीच तयार करण्यात आलेला आहे. तसेच हा निधी आपली गुंतवणूक वाढण्यासाठी मदत करतो.या निधीद्वारे बाजारातून मिळणाऱ्या उत्पनावर लक्ष ठेवली जाते. बाजारानुसार, हेजिंगसमवेत इक्विटी, कॅश आणि तारीखमध्ये आपल्या अॅसेट अॅलोकेशनमध्ये वेगाने  बदलाव करतात. ही सुविधा डायनॅमिक निधीला इतर सामान्य डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड्सच्या तुलनेत अधिक आधार मिळतो. जेव्हा शेअरचे दर कमी असतात, तेव्हा डायनॅमिक निधीचे व्यवस्थापक इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढवतात. आणि जेव्हा शेअरचे दर जास्त असतात, तेव्हा हे इक्विटीमधून गुंतवणूक कमी करून दुसऱ्या तारखेची वाट पाहतात. तसेच बाजारात तेजी असेल तर अधिकतर डायनॅमिक निधीच्या तारखेमध्ये जास्त विभाजन होते. या निधीमध्ये इतर डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडच्या तुलनेत कमी जोखीम असते.

 

तसेच डायनॅमिक निधीचे लक्ष मार्केट व्हॅल्युएशनवर असल्यामुळे बाजारात शॉर्ट टर्ममध्ये दिसणाऱ्या रॅलीमध्ये यांना नुकसानही होऊ शकते. पण दिर्घ मुदतीमुध्ये भरपाई मुदत संपुष्टात येते कारण, दिर्घ कालावधीत बाजारातील कंपन्यांचे उत्पन्न वाढीच्या आधारावर अंवलंबून असते. डायनॅमिक फंड्सला शेअरमध्ये योग्य प्रमाणात केलेल्या गुंतवणूकीचा फायदा मिळतो. त्यामुळे असे लोक जे पहिल्यांदा शेअरमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि त्यांना जोखीम घ्यायची नसेल तर डायनॅमिक फंड त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. 
- ताहेर बादशाह, सीईओ, अॅक्टीव्हीटीज, इन्वेस्को म्यूचुअल फंड.
 

बातम्या आणखी आहेत...