आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीवायएसपींना धमकी प्रकरण; कॉन्स्टेबलची होईल चौकशी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - पोलिस दलाच्या शिस्तीला शोभेल असे वर्तन करावे, असे सांगितल्यामुळे उपअधीक्षक रवींद्र सोनवणे यांना धमकावल्याचा आरोप असलेल्या कृष्णा पाटील यांच्यावर खातेनिहाय कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठांनी दिले. प्रसंगी कठोर कारवाईही होऊ शकते, अशी माहितीही देण्यात आली.

 

पाेलिस दलातर्फे सध्या गोळीबाराचा सराव केला जात आहे. यासाठी मुख्यालयात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल कृष्णा पाटीलही गेले होते. या वेळी गृह विभागाचे उपअधीक्षक रवींद्र सोनवणे यांनी पाटील यांना अडवले. शर्टचे उघडे बटन, शासकीय ऐवजी खासगी बूट व इतर बाबतीत पाटील यांना सूचना देण्यात आल्या. त्याचा राग आल्यामुळे कॉन्स्टेबल पाटील यांनी सोमवारी दुपारी व रात्री उपअधीक्षक सोनवणे यांना मोबाइलवर धमकी दिली

 

. शिवाय तुमचे करिअर खराब करेल, हेतूत: त्रास दिला. मी आता अॅडमिट होतो आहे. पुढील गोष्टीला आपण जबाबदार रहाल, अशा शब्दात सुनावले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सोनवणे यांच्या तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. परंतु या घटनेमुळे पोलिस दलाला अभिप्रेत असलेल्या शिस्तीचे उल्लंघन झाले. यासह गैरवर्तनचा ठपका पाटील यांच्यावर ठेवला जाणार आहे. यातून त्यांची खातेनिहाय चौकशीही केली जाऊ शकते. त्यात दोषी आढळल्यास कठोर व कटू कारवाई हाेईल. वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी यास अधिकृत दुजोरा दिला आहे.


पाटील यांनाही असावी संधी
अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन कृष्णा पाटील यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. परंतु याप्रकरणी पाटील यांचे म्हणणेही ऐकून घेतले पाहिजे. शिवाय तथ्य व पाटील यांच्यावरही वेळ कशी व कोणामुळे आली याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अन्यथा अधिकाऱ्यांची तक्रार आणि अधिकाऱ्यांकडूनच कारवाई, असे एकेरी चित्र उमटून चुकीचा संदेश जाऊ शकतो.


सध्या खातेनिहाय चौकशी
या प्रकरणी खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. यासाठी सक्षम अधिकारी स्वत: प्रकरणाची चौकशी व जबाब घेतील. अजून कारवाई झालेली नाही. चौकशीनंतरच पुढील दिशा ठरवली जाणार आहे. -विश्वास पांढरे,पोलिस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...