आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • E buses On Two Routes In The State Including Aurangabad; Estimates To Start The ST Corporation Bus By March 2020

औरंगाबादसह राज्यातील दाेन मार्गांवर ई-बस; मार्च २०२० पर्यंत एसटी महामंडळाच्या बस सुरू हाेण्याचा अंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन जैन 

नाशिक - खासगी प्रवासी वाहतुकीसाेबत स्पर्धा करताना एसटीच्या वतीने कात टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अत्याधुनिक शिवशाही बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर एसटीने ई-बस अर्थात शिवाई लाँच केली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे-नाशिक मार्गासह पुणे-काेल्हापूर, पुणे-औरंगाबाद या मार्गांवर शिवाई बस मार्च २०२० पर्यंत सुरू हाेणार असल्याची माहिती एस.टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाकडून उत्पन्न वाढावे तसेच अधिकाधिक प्रवासी एसटीकडे वळावे या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. शिवशाही बसेसमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ झाल्याने एसटीच्या वतीने माेठा गाजावाजा करत पर्यावरणपूरक ध्वनी व वायुप्रदूषणरहित शिवाई बस सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत ५ सप्टेंबर राेजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बसचे लाेकार्पण करण्यात आले हाेते. एसटी महामंडळाला महाराष्ट्र राज्य वीजपुरवठा महामंडळाकडून उच्च दाबाचे विद्युतवाहिनी आगार क्षेत्रापर्यंत जाेडणी करून देणे आवश्यक आहे. अशाप्रकारची जाेडणी मिळाल्यानंतर तेथे खासगी बसमालक स्वखर्चाने चार्जिंग स्टेशन उभे करणार असल्याने या बसेस मार्च २०२० पर्यंत धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बससेवेचे तिकीट दर अजून निश्चित झालेले नसून साधारणत: शिवशाही बससेवेच्या तिकीट दरापेक्षा किंचित जास्त, मात्र शिवनेरी बससेवेच्या तिकीट दरापेक्षा कमी असे तिकीट राहणार आहे.  या नव्या बसेसमुळे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण टळणार आहे. तसेच या बसेसमुळे इंधनावर होणारा खर्चदेखील वाचणार आहे. त्यामुळे या  बसेसचे सर्वांसाठी पर्वणी ठरतील.५० बसेस भाडेकरारावर घेणार

प्रसन्ना पर्पल या खासगी वाहतूक संस्थेबराेबरच ५० ई-बस पुरविण्याचा करार एसटी महामंडळाने केला आहे. त्यानुसार सरासरी ४५ रुपये प्रती किमी या भाड्याने सदर बस महामंडळ संबंधित संस्थेकडून भाड्याने घेणार आहे.

पहिली सार्वजनिक वाहतूक संस्था

दाेन शहरांदरम्यान पर्यावरणपूरक ध्वनी व वायुप्रदूषणरहित ई-बस चालवणारे एसटी महामंडळ हे देशातील पहिली सार्वजनिक वाहतूक संस्था ठरणार आहे.