आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • E commerce And GST Hope To Create 1.49 Lac Jobs In Logistics In Just 6 Months, Need Enough Knowledge Of English

ई-कॉमर्स आणि जीएसटीमुळे लॉजिस्टिक्समध्ये केवळ 6 महिन्यांत 1.49 लाख रोजगार निर्मितीची आशा, इंग्रजीचे सामान्य ज्ञान पुरेसे

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
 • कॉपी लिंक
मेहेरनोष मेहता - उपाध्यक्ष, महिंद्रा लॉजिस्टिक - Divya Marathi
मेहेरनोष मेहता - उपाध्यक्ष, महिंद्रा लॉजिस्टिक
 • आर्थिक सर्वेक्षण 2017-18 नुसार लॉजिस्टिक्स क्षेत्रात 2.2 कोटींहून जास्त रोजगार मिळाले, निर्यात वाढल्याने रोजगार वाढ
 • लाॅजिस्टिक्समध्ये रोजगार संधीबाबत सांगताहेत महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उपाध्यक्ष

​​​​​​मुंबई : सरकारने नॅशनल लॉजिस्टिक्स धोरण तयार केले आहे. यामुळे २०२० मध्ये लॉजिस्टिक्स क्षेत्रात सुमारे २१५०० कोटी डॉलर पोहोचण्याची आशा आहे. आर्थिक सर्वेक्षण २०१७-१८ नुसार, २.२ कोटीहून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. यावर महिंद्रा लॉजिस्टिक्सचे उपाध्यक्ष मेहेरनोष मेहता यांच्याशी केलेली चर्चा...

लॉजिस्टिक्स सेक्टरमध्ये विविध पदांसाठी कोणती पात्रता व कौशल्याची आवश्यकता असते?

पदवी मुख्य पात्रता आहे. मात्र, ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये एमबीए वा पीजीची आवश्यकता आहे. आम्हास ऑपरेशन हेड, शिफ्ट इन्चार्ज व सेक्शन प्रभारीसारख्या पदांसह छाननी, निवड व पॅकेजिंगसाठी लोकांची आवश्यकता असते. पत्ता पिन कोड व बिन नंबर वाचता येण्यासाठी उमेदवारांना सामान्य इंग्रजीचे ज्ञान असावे.

फ्रेशर्स आणि अनुभवी व्यावसायिकांना संधी कशा ?

वरिष्ठ स्तरावर नेतृत्व क्षमतेच्या आकलनासाठी सायको-मेट्रिक मूल्यांकन करतो. आम्ही काही प्रकारच्या नोकऱ्या उदा. बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस एक्सलन्स आणि एचआरसाठी अनुभवी व्यावसायिकांची गरज आहे. याशिवाय ऑटोमेशन, इंडस्ट्री, कंझ्युमर ड्युरेबल/ नाॅन ड्युरेबल, एफएमसीजी व फार्मासारख्या क्षेत्रांत काम केलेल्या उमेदवारांना आमचे प्राधान्य आहे.

तुमची कंपनी कोणत्या श्रेणीत रोजगार देते?

प्रामुख्याने वेअरहाऊस ऑपरेशन, इन-फॅक्ट्री लॉजिस्टिक्स, ट्रान्सपोर्टेशन आणि ई-कॉमर्समध्ये नोकऱ्या असतात. आम्ही सप्लाई चेन मॅनेजमेंट, ट्रान्सर्पोटेशन, वेअरहाऊस, ऑपरेशन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनसारख्या क्षेत्रांसाठी जोखीम पसंत लोकांचा शोध घेतो. उमेदवार एसएपी, ईआरपी, आयओटी(इंटरनेट ऑफ थिंग्ज), व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेशन रियल्टी, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि एआय यासारख्या तंत्रज्ञाची ओळख असावी. हा एक प्लस पॉइंट आहे.

मुलाखतीसाठी कशी तयारी केली पाहिजे?

नोकरीसाठी अर्ज करण्याआधी उमेदवारांना त्या कंपनीची माहिती, तिची पार्श्वभूमी आणि कार्य संस्कृती आदीबाबत संशोधन केले पाहिजे. उमेदवाराची मुलाखत कोणत्या प्रकारे घेतली जाते हे जाणणे आवश्यक आहे.

तुमच्या कंपनीत प्रवेश प्रक्रिया कशी आहे?


नौकरी.कॉम, लिंक्डइन आणि महिंद्रा लॉजिस्टिक्स.कॉमवर संधी शोधल्या पाहिजेत. आम्ही अंतर्गत रेफरल व कॅम्पस भरतीही करतो. आमच्या कंपनीने महिलांची भरती प्रक्रिया वाढवली आहे. ज्या महिलांनी कोणत्या कारणास्तव नोकरी सोडली,अशा पुन्हा जोडल्या जाऊ शकतात.

या क्षेत्रात फ्रेशर्स आणि अनुभवी व्यावसायिकांना कोणती कौशल्ये हवी आहेत ?

फ्रेशर्ससाठी आम्ही ज्यांच्याकडे संचार कौशल्य आहे, पायाभूत विषयाची माहिती, विश्लेषणात्मक क्षमता आणि आयटी ज्ञान आहे अशा व्यक्तींना पसंती देतो. तो एक चांगल्या टीमचा सदस्य असायला पाहिजे, त्याच्यात चांगले अांतर-वैयक्तिक कौशल्य असायला हवे. अनुभवी व्यक्तींसंदर्भात आम्ही लोकांत व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन, व्यवसायाची समज, धोरण विकसित करणे, व्यवसाय, ग्राहक व प्रकल्प व्यवस्थापनासाठी दृष्टीचा शोध घेतो.

२०२० मध्ये भारतात लॉजिस्टिक्स क्षेत्र २१५०० कोटी डॉलरपर्यंत पोहोचेल... 

 • आर्थिक सर्वेक्षण २०१७-१८ नुसार २.२ कोटींपेक्षा अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
 • कौशल्य विकास अप्रत्यक्ष लॉजिस्टिक्सच्या गुंतवणुकीत १०% कपात होईल, यामुळे निर्यातीत ५-८% ची वृद्धी होईल.
 • सध्या भारतात लॉजिस्टिक उद्योगाचा आकार साधारण १६० अब्ज डाॅलर आहे.
 • २०२० मध्ये साधारण २१५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची आशा, हा १०.५ टक्क्यांच्या सीएजीआरने वाढत आहे.
 • टीमलीज सर्व्हिसेजने एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० साठी रोजगार आऊटलूक अहवालात १.४९ लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला.
 • २०२२ पर्यंत लॉजिस्टिक क्षेत्रात रोजगार १३.९ दशलक्ष वाढू शकते. ही सध्याच्या १०.९ आहे.
 • टियर टू शहरांत एप्रिल-सप्टेंबर २०१९-२० मध्ये हायरिंग सेंटिमेंटमध्ये ५ टक्के व टियर थ्री शहरांत व ग्रामीण क्षेत्रांत २ टक्के वृद्धी झाली.

या विभागात रोजगार

सप्लाय चेन मॅनेजर, ट्रान्सपोर्ट मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर आणि प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन मॅनेजर, वेयरहाऊस मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, फोरमन, स्टमर सर्व्हिस मॅनेजर, फुलफिलमेंट सुपरवायजर, सप्लाय चेन अॅनालिस्ट, सल्लागार, शिपिंग कॉर्डिनेटर, एक्सेडिटर आदी.

 

बातम्या आणखी आहेत...