आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-कॉमर्स कंपन्यांमुळे रिटेल क्षेत्राचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  मागील काही दशकांपासून शॉपिंग मॉलच्या कोपऱ्यावरील जागेवर डिपार्टमेंटल स्टोअर्स असत. अमेरिकेतील मेसिजसारख्या चेन स्टोअर्सची यात भरभराट झाली. मात्र आता ट्रेंड बदलत आहे. एकेकाळी आधार असलेले हे स्टोअर्स आता मॉलसाठी ओझे बनत आहेत. ई-कॉमर्स कंपन्या आणि टीजे मॅक्ससारख्या डिस्काउंट स्टोअर्सचा यांना चांगलाच फटका बसत आहे. रिटेल क्षेत्रात हा बदल झपाट्याने होत आहे. त्यामुळे बड्या रिटेल कंपन्यांनी सावध होण्याची ही वेळ आहे.  
मेसिज स्टोअर सध्या कमी खर्चात कपात करत आहे. सिअर्स बोल्डिंग्स हा रिटेल ब्रँडही अशाच प्रकारे दीर्घकाळापासून बचावासाठी प्रयत्न करत आहे. मेडिसन ग्लोबल पार्टनर्समध्ये रिटेल क्षेत्रातील विश्लेषक बर्नार्ड सोनिक म्हणतात की, सर्वच प्रकारच्या रिटेल स्टोअर्ससमोरील समस्या वाढत आहेत.  वेळीच शटर बंद करून अन्य ब्रँड्सना संधी देणे हाच उत्तम पर्याय आहे.  
अमेरिकेतील मोठमोठ्या शॉपिंग सेंटर्समध्ये काही ठिकाणी मोक्यावरील जागा विक्रीसाठी तसेच नॅशनल ब्रँड्सला आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रीन स्ट्रीट अॅडव्हायझर्स या मॉल क्षेत्रातील बदल टिपणाऱ्या संस्थेने गेल्या वर्षी मोठ्या संख्येने डिपार्टमेंटल स्टोअर्स बंद झाल्याचे सांगितले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे मॉल्सना आता रिटेल स्टोअर्सची तितकी गरज भासत नाही. एकेकाळी मॉल मालक चार किंवा पाच डिपार्टमेंटल स्टोअरसाठी जागा राखून ठेवत असत. तसेच त्यांच्याकडून भाडेही कमी घेत असत.  

व्हिक्टोरिया सिक्रेट स्टोअरचे व्यवस्थापक लेस वॅक्सनर म्हणतात, १० -१५ वर्षांपूर्वी एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरने मॉलची जागा सोडली तर मॉल व्यवस्थापकासमोर संकट उभे राहत असे. आता अनेक व्यवस्थापक ही जागा पुन्हा मॉलकडे घेण्याचे प्रयत्न करत आहेत. रिटेल इंडस्ट्रीतील तज्ज्ञांच्या मते, नव्या राष्ट्राध्यक्षांची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे. कदाचित ते रिटेल इंडस्ट्रीच्या फायद्यासाठी काही पावले उचलतील.  

-स्पर्धा : गेल्या काही वर्षांमध्ये डिपार्टमेंटल स्टोअरच्या उद्योगावर चहुबाजूंनी संकट ओढवले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ई-कॉमर्स वेबसाइट्स. ग्राहक थेट ब्रँड किंवा अन्य कंपन्यांच्या वेबसाइटवरून खरेदी करत आहेत. सवलती देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना विविध ऑफर देऊन आकर्षित करत आहेत. यामुळे किंमत आणि ब्रँड यात स्पर्धा लागली आहे.  

- आकर्षण : अनेकदा प्रसिद्ध ब्रँडपेक्षा चांगल्या दर्जाच्या वस्तू ई-कॉमर्स साइटवरून साधारण ब्रँडमध्ये सवलतीवर मिळतात. त्यामुळेदेखील ब्रँडची विक्री कमी होते. याचा सर्वात 
मोठा फटका मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्सला बसत आहे.  

- क्रमवारी: सध्या रिअल इस्टेट कंपन्या मॉलची क्रमवारी ठरवत आहेत. त्यांचे रिपोर्ट कार्डही असते. एखाद्या मॉलला ए++ मिळाले तर त्याचे स्थान आणि प्रतिचौरस फूटमध्ये विक्रीची टक्केवारी उत्तम असते. सी ही क्रमवारी मिळाली तर हे मॉल बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मॉलमधील स्टोअर्सच्या क्रमवारीत गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसत आहे. त्यापैकी काही आता बंद होत आहेत.

© The New York Times
बातम्या आणखी आहेत...