आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या वांद्रेतील घरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल मुंबई पोलिसांना मिळाल्याने एकच खळबळ उडाली. "बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मुंबईतील वांद्रेतील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासात त्याचा स्फोट होईल," अशी खळबळजनक माहिती मुंबई पोलिसांनी ईमेलद्वारे मिळाली.
मीडिया रिपोर्टनुसार मुंबई पोलिसांना खळबळजनक मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सलमानच्या घरी धाव घेतली. मात्र पोलिसांनी सलमानकडे कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने हा मेल खोटा असल्याचे पोलिसांना लक्षात आले. या खोट्या ईमेलप्रकरणी पोलिसांनी उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणाहून मेल पाठवणाऱ्या 16 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी वांद्रे पोलिसांना एक मेल मिळाला. त्यात “सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासांत त्याचा स्फोट होईल. रोक सकते हो तो रोक लो.” असा मेल आला होता. मेल आल्यानंतर पोलिस विभागाने तातडीने बॉम्ब शोधक पथकासह सलमानच्या घरी रवाना झाले. ज्यावेळी पोलिस सलमानच्या घरी पोहोचले, तेव्हा सलमान तिथे उपस्थित नव्हता. त्यानंतर पोलिसांनी सलमानचे वडील सलीम खान, आई सलमा खान, बहीण अर्पिता खान यांना सुरक्षित बाहेर काढले. तब्बल 4 तास सलमानच्या घराची शोधाशोध केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.