आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येकाची सकाळ जप, दीप सहित या 5 गोष्टींनी सुरु व्हावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनातन परंपरांमध्ये हिंदू ग्रंथांनी संतुलित जीवनशैलीसाठी विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यामधीलच एक महत्त्वपूर्ण ग्रंथ गरुड पुराण आहे. या पुराणामध्ये आदर्श जीवन आणि मृत्यूनंतर घडणाऱ्या गोष्टींविषयी सांगण्यात आले आहे. पुराणानुसार प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्येत काही गोष्टी समाविष्ट असणे आवश्यक आहे. यामध्ये सकाळच्या वेळी दिवसाची सुरुवात खास 5 गोष्टींपासून व्हावी. याशिवाय दिवस अपूर्ण राहतो. गरुड पुराणातील एका श्लोकामध्ये याविषयी सांगण्यात आले आहे.

  • श्लोक -

स्नानं दानं होमं स्वाध्यायो देवतार्तनम्।

यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम्।।

1. स्नान
स्नान हे मनुष्याच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे. पुराणांनुसार प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात स्नान करुन करावी. जो मनुष्य रोज सकाळी सर्वात अगोदर अंघोळ करुन पवित्र होतो त्याचा पुर्ण दिवस शुभ आणि ऊर्जायुक्त जातो.

2. दान 
अनेक धर्म-ग्रंथ आणि पुराणांमध्ये दानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या श्रध्देप्रमाणे काही ना काही अवश्य दान करावे. असे केल्याने कधीच धन-धान्याची कमतरता येत नाही आणि सुख-शांति टिकून राहते.

3. हवन किंवा दिवा लावणे 
हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील सुख-शांतिसाठी दिनचर्येत हवन करण्याचा नियम बनवावा. जर रोज हवन करणे शक्य नसेल तर तुळशी आणि देवा समोर रोज दिवा लावावा. असे केल्याने मनुष्याला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळते.

4. जप 
प्रत्येकाने आपल्या दिवसातील थोडासा वेळ मंत्र जपासाठी दिला पाहिजे. तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा जप करु शकता, परंतु रोज अवश्य जप करा. पुर्ण श्रध्दा आणि विश्वासाने केलेला जप कधीच व्यर्थ जात नाही. मनुष्याला केलेल्या जपाचे शुभ फळ अवश्य मिळते.

5. देवपूजन 
देवाची पूजा करणे हे हिंदू धर्मातील संस्कार आहेत. रोज सकाळी स्नान करुन देवाची पूजा करावी आणि त्यांना नैवैद्य दाखवावा. असे केल्याने कुटूंबावर आलेले संकट आपोआप दूर होते. यामुळे नियमित देवाची पूजा करावी.

बातम्या आणखी आहेत...