Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | early morning hot water drinking health benefits

रोज सकाळी कोमट पाणी पिण्याचे 10 फायदे, किडनी राहते निरोगी आणि पोट होते कमी

हेल्थ डेस्क | Update - Aug 27, 2018, 12:05 AM IST

आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आपण रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते.

 • early morning hot water drinking health benefits

  आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आपण रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते आणि यासोबतच अनेक आरोग्य समस्या दूर होतात. आज आम्ही कोमट पाणी पिण्याच्या १० फायद्यांविषयी सांगणार आहोत...


  पोट कमी करा : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते.


  सर्दी-पडसे दूर : कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी-पडशाची समस्या दूर होते.


  दम्याची समस्या नियंत्रित : रोज कोमट पाणी प्यायल्याने घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते.


  स्नायुदुखी कमी : कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू आखडतात आणि वेदना होतात.


  किडनीसाठी चांगले : रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो.


  घाण निघते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.

 • early morning hot water drinking health benefits

  अॅसिडिटी दूर करते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरामधील अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते. 


  भूक वाढवते : रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते. 

 • early morning hot water drinking health benefits

  पचनक्रिया सुधारते : रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होते. 


  त्वचा चांगली राहते : रोज कोमट पाणी प्यायल्याने घामाच्या माध्यमातून त्वचेमधील घाण बाहेर पडते. स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो. 

Trending