Home | Business | Business Special | earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

Youtube व्हिडीओ पाहून महिन्याला कमवा 30 हजार रुपये, अशी आहे प्रोसेस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2018, 12:22 PM IST

तुम्हाला Youtube वर व्हिडीओ पाहायला आवडत असेल तर तुमच्या या आवडीचा वापर करून तुम्ही महिन्याला 30 हजार रुपये कमावू शकता.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  तुम्हाला Youtube वर व्हिडीओ पाहायला आवडत असेल तर तुमच्या या आवडीचा वापर करून तुम्ही महिन्याला 30 हजार रुपये कमावू शकता. हे काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. एक इंटरनेट कनेक्शन आणि दुसरी व्हिडीओ पाहण्यासाठी दररोजचा काही वेळ.


  या 3 टिप्सने राहाल फायद्यात
  - हे काम हातात घेण्यापूर्वी आपल्या सुविधेनुसार एक किंवा दोन साइटचे सालेक्शन करून त्यावरच लक्ष केंद्रित करा.
  - या ऑनलाइन साइट्स सेकंदाच्या हिशोबाने पेमेंट करतात. यामुळे तुम्ही जेवढे जास्त व्हिडीओ पाहाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. यासाठी दररोज दोन ते पाच तासांचा वेळ या कामासाठी निश्चित करा आणि या वेळेत या साइट्सवर राहण्याव्यतिरिक्त काहीही करू नका.
  - या पार्ट टाइम कामाने त्वरित कमाई होत नाही. चांगली रक्कम हवी असल्यास तुम्ही काम करत राहणे आणि सयंम बाळगणे आवश्यक आहे.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  साइट : पेड2यूट्यूब
  कमाई : 200 रुपये प्रती तास 

   

  कशी करावी कमाई 
  या साइटवर तुम्हाला 30 सेकंदाचा युट्युब व्हिडीओ पाहून त्यावर कमेंट करण्याचे पैसे मिळतात. कमाई वाढवण्यासाठी युट्युब चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांना रेफर केले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला 200 रुपये प्रती तास कमाई होऊ शकते. तुम्ही हे सर्व काम एकाच वेळी करू शकता किंवा वेगवेगळ्या वेळी पूर्ण करू शकता. साइटच्या अकाउंटमध्ये 670 रुपय जमा झाल्यानंतर सात दिवसांनी पेपल अकाउंटने तुम्हाला पेमेंट दिले जाते.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  साइट – स्वॅगबक्स  
  कमाई –250 रुपये प्रती तास 


  कशी करावी कमाई 
  स्वॅगबक्समध्ये व्हिडीओ पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही सर्व्हेच्या माध्यमातूनही पैसे मिळवू शकता. प्रत्येक क्लिक आणि व्हिडीओ पाहण्यासाठी स्वॅगबक्स  एक एसीबी ते 30 एसीबीपर्यंत पॉईंट्स देते. 500 एसीबी पॉईंट्स झाल्यानंतर तुम्हाला 250 रुपयांचे फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनचे गिफ्ट कार्ड मिळते आणि तुम्ही तुमची आवडीची गोष्ट खरेदी करू शकता.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  साइट : यू-क्‍यूबेज
  कमाई : 67 रुपय प्रती तास 


  कशी करावी कमाई 
  जाहिरात एजन्सीची ही साइट तुम्हाला प्रती क्लिकच्या हिशोबाने 0.005 सेंट (यूएस डॉलर) पेमेंट करते. दिवसभरात या साइटवर तुम्ही व्हिडीओ, जाहिरात आणि साइट वेबपेजवर 200 क्लिक केल्यास तुम्हाला 67 रुपये प्रती तासाला मिळू शकतात. रेफरन्स देऊन किंवा साइटवर दिसणाऱ्या एखाद्या वेबसाइटवरून खरेदी केल्यास तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकतो.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  साइट : सक्सेसबक्स    
  कमाई : 67 रुपय प्रती तास 


  कशी करावी कमाई
  सक्सेसबक्सवर तुम्हाला फक्त व्हिडीओ पाहण्यासाठी पैसे मिळत नाहीत तर साइन अप आणि क्लिक करण्यासाठीसुद्धा पैसे मिळतात. जाहिरात एजन्सीची ही साइट प्रत्येक क्लिकसाठी 0.1 सेंटपासून एक डॉलरपर्यंत कमाई करण्याची संधी देते. साइटविषयी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही तुमच्या अकाउंटमध्ये कमीत कमी 67 रुपये जमा होताच पेपल अकाउंटला पाठवते.

 • earn upto rs 30 thousand per month by watching videos on youtube

  अॅप  – स्‍लाइड जॉय
  कमाई : 33 रुपय प्रती तास 


  कशी करावी कमाई 
  हे अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये इंस्‍टॉल केल्यानंतर तुम्ही काहीही केले नाही तरी तुम्हाला पैसे मिळतील. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक तासाला 33 रुपये कमावू शकता. या अॅपची सर्वात खास गोष्ट म्हणजे हे फक्त तुमच्या स्मार्टफोनच्या लॉकस्क्रीनचा वापर करते. म्हणकेच फोनचा स्क्रीन लॉक झाल्यास यावर जाहिरात चालू राहील आणि अनलॉक करताच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होतील.

Trending