• Home
  • News
  • Earned Rs 257 crore in 11 days, 'War' becomes the second highest grosser movie of 2019 after 'Kabir Singh'

बॉक्स ऑफिस / 11 दिवसांत कमवले 257 कोटी रुपये, 'कबीर सिंह' नंतर 2019 चा दुसरा हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला 'वॉर'

परदेशातही दिसते आहे चित्रपटाची जादू

दिव्य मराठी वेब टीम

Oct 13,2019 05:23:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफचा चित्रपट 'वॉर' 2019 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला आहे. रिलीजनंतर केवळ 11 दिवसांत 'वॉर' चे ओव्हर ऑल कलेक्शन 250 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. 'वॉर' च्या पुढे आता केवळ शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंह' आहे, ज्याचे लाइफ टाइम कलेक्शन 278.24 कोटी रुपये आहे.


ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शच्या ट्वीटनुसार 'वॉर' च्या हिंदी व्हर्जनचे कलेक्शन 246.80 कोटी रुपये आहे. तर याच्या तमिळ आणि तेलगु व्हर्जनचे कलेक्शन मिळून 257.75 कोटी झाले आहे.


दिवस कमाई

पहिला दिवस 53.35 कोटी रुपये
दुसरा दिवस 77.7 कोटी रुपये
तीसरा दिवस 100.15 कोटी रुपये
चौथा दिवस 128.85 कोटी रुपये
पाचवा दिवस 166.25 कोटी रुपये
सहावा दिवस 187.75 कोटी रुपये
सातवा दिवस 216.65 कोटी रुपये
आठवा दिवस 228.55 कोटी रुपये
नववा दिवस 238.35 कोटी रुपये
दहावा दिवस 245.95 कोटी रुपये
अकरावा दिवस 257.75 कोटी रुपये


परदेशातही दिसते आहे चित्रपटाची जादू...
नॉर्थ अमेरिकामध्येही ऋतिकचा हा चित्रपटसर्वात जास्त कमाई करणारा बनला आहे. यूएस आणि कॅनडा मिळून चित्रपटाने 3.2 मिलियन डॉलरचे कलेक्शन केले आहे. 'वॉर' ने ऋतिकचेच चित्रपट 'जिंदगी न मिलेगी दोबारा', 'बँग बँग', 'सुपर 30', 'जोधा अकबर', 'क्रिश 3' आणि 'अग्निपथ' यांना मागे टाकले आहे.

X
COMMENT