आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावडोदरा - येथील सरकार इस्टेट कंपनीत एका महिला सफाई कर्मचाऱ्याला एका दुर्घटेन आपले प्राण गमवावे लागले. महिला सोमवारी सकाळी चहू बाजुंनी उघड्या इंडस्ट्रियल लिफ्टमधून वरच्या मजल्यावर जात होती. दरम्यान तिने आपले डोके बाहेर काढले असता वरील मजल्याचा एक खांब तिच्या डोक्याला लागला. यामुळे तिचे शिर धडापासून वेगळे झाले. घटना घडतेवेळी महिलेच्या कानात इअरफोन लावलेले होते.
डोके बाहेर काढले आणि घडली घटना
मुळतः उत्तरप्रदेश येथील असलेली सुशीला प्रेमशंकर विश्वकर्मा (40 वर्ष) दोन वर्षांपासून आजवा रोडच्या चामुंडानगर येथे राहत होती. ती सरदार इस्टेटच्या मारुती प्लास्टिक कंपनीत साफ-सफाईचे काम करत होती. सोमवारी सकाळी 8 वाजता ती कंपनीत काम करण्यासाठी गेली. पहिल्या मजल्यावरील काम पूर्ण केल्यानंतर पुढील काम करण्यासाठी ती इंडस्ट्रियल लिफ्टने वरच्या मजल्यावर जात होती. तेव्हा तिने आपल्या कानात इअरफोन लावले. लिफ्टमधून वर जाताना काही कारणास्तव बाहेर पाहण्यास सुरूवात केली. दरम्यान वरील एक खांब तिच्या डोक्याला येऊन धडकला. यानंतर थोड्याच वेळात तिचे मुंडके खाली पडले आणि धड लिफ्टमध्येच राहिले होते. मोबाइल तिच्या मृत्युला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. कारण कानात इअरफोन असताना तिला समजलेच नाही की खाली पाहत असताना वरील खांब तिच्या डोक्याला लागू शकतो. पोलिसांनी या घटनेबाबत तपास सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.