आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातिराना- युरोपीय देश अल्बानियाची राजधानी तिरानामध्ये मंगळवारी आलेल्या भूकंपात 21 जणांचा मृत्यू झाला आहे तर 350 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. अल्बानिया सरकारमधील दूरसंचार विभागाचे संचालक अँड्री फुगाने सांगितले की, या भूकंपाची 6.4 रिश्टर स्केल इतकी तीव्रता होती. अमेरिकेतील भूवैज्ञानिक सर्वेक्षणने सांगितले की, भूकंपाचे केंद्र तिरानापासून उत्तर-पश्चिम दिशेला असलेल्या शिजाक शहरात होते.
फुगाने सांगितले की, भूकंपातून आतापर्यंत 45 जणांना सुरक्षित वाचवण्यात आले आहे. अल्बानिया ‘डेली न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या. यात 21 जणांचा मृत्यू झाला आणि 350 जखमी झाले. त्यामुळे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच दिवशी, 26 नोव्हेंबर 1920 मध्येही अल्बानियामध्ये भयंकर मोठा भूकंप आला होता, त्यात 200 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.