आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती / धारणी- धारणी जिल्ह्यातील २ हजार लोकसंख्येचे गाव साद्रावाडी येथे शुक्रवार, दि. १७ आॅगस्ट रोजी दुपारी २.३० च्या सुमारास भूकंपाचे काही क्षण पाच सौम्य धक्के जाणवल्याने गावातील आदिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. धारणी परिसरात याआधी एप्रिल २००५ मध्येही असेच भूकंपाचे सौंम्य धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवेले त्यावेळी गावात फारसे कोणीही नव्हते. बहुतेक गावकरी शेतावर कामाला गेले होते. तसेच आठवडी बाजाराचा दिवस असल्याने काही गावकरी तेथे गेले होते.
दुपारी भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे पाहून घाबरलेल्या ग्रामस्थांनी साद्रावाडी येथे सौम्य प्रमाणात जमीन हादरल्याची माहिती तहसीलदार ए. टी.गाजरे यांना दूरध्वनीद्वारे कळवली. त्यानंतर तहसीलदारांनीही गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या सौम्य धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविले. मात्र, परिसरात भूगर्भातील हालचालींची नोंद घेणारे केंद्र नसल्यामुळे या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर कळू शकली नाही. रात्री उशिरा विचारणा केल्यानंतरही जिल्हा प्रशासनाकडे भूकंपाच्या तीव्रतेची माहिती मिळाली नव्हती. आम्ही नागपूर येथील केंद्रासोबत संपर्क साधल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले.
धारणीतील खाऱ्या टेंभरू येथे तापी खोरे विकास महामंडळाकळून गेल्या काही वर्षांपूर्वीभूमापन केंद्र उभारण्यात आले होते. हे केंद्र सध्या बंद असल्यामुळे रिश्टर स्केलवर या भूकंपाच्या धक्क्याची नोंद घेता आली नाही. रविवारी साद्रावाडी येथे अशीच भूकंपाच्या धक्क्याची अफवा पसरविण्यात आली होती. पण शुक्रवारी २ वाजून ३५ मिनिटांनी पुन्हा साद्रावाडी येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने परिसरातील आदिवासी जनता हादरून गेली आज बसलेल्या भूकंपाच्या धक्का जाणवल्याच्या वृत्ताला येथील तहसीलदारांनी दुजोरा दिला अाहे. ग्रामस्थांचा जमिनीला धक्के बसत असल्याचा फोन तहसीलदारांना गेला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गावात पोहोचली. साद्रावाडी गावावर प्रशासनाचे लक्ष असून मदतीसाठी यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे.
दरम्चयान, भूकंप ही मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जाते. हाहाकार उडवून देण्याची क्षमता तिच्यामध्ये असते. मराठवाड्यातील किल्लारी येथील भूकंप असो किंवा गुजरातमधील भूज येथील भूकंप असो तेथील प्रचंड हानी लोक आजही विसरू शकलेले नाहीत.
जिल्हा प्रशासन सतर्क
साद्रावाडीत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने तहसीलदारांसह जिल्हा प्रशासनही सतर्क आहे. मदत पथक तयार ठेवण्यात आले आहे. तेथून कोणत्याही जीवित व आर्थिक हानीची माहिती नाही.
- डाॅ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी.
चिंतेचे फारसे कारण नाही
भूगर्भातील नियमित व नैसर्गिक हालचालींमुळे हे धक्के जाणवले असावेत. जर रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता ३ पर्यंतही असेल तरी चिंतेचे फारसे कारण नाही. एवढ्यातच भूकंपाचे धक्के का जाणवले, या निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही. कारण हा भाग बेसाल्ट खडकावर आहे. अशा ठिकाणी भूकंपाची तीव्रता कमी असते. तसेच गावालगत गवरांडो नामक तलावही आहे. त्यामुळेही कदाचित जमीन हादरली असेल. भूगर्भातील काही भेगा भरल्या जाण्यासाठी असे अधूनमधून घडत असते. ही नियमित व नैसर्गिक प्रक्रिया आहे.
- डाॅ. एस.एफ.आर.खाद्री, भूगर्भतज्ज्ञ, अमरावती विद्यापीठ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.