आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake : साताऱ्यातील कोयना परिसरात 4.8 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, सुदैवाने कोणतीही हानी नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - साताऱ्यात कोयना आणि आसपासच्या परिसरात गुरुवारी सकाळी 4.8 स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 7 वाजून 48 मिनिटांनी भूकंप झाला. कोयनापासून 10 किमी अंतरावर याचे केंद्र आहे. भूकंपामुळे संबंधीत भागात कोणतीही हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. कोयना व्यतिरिक्त कराड आणि पाटण परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. 

 

कोयना भागात गेल्या काही महिन्यांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. यामुळे येथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे लोक भीतीपोटी रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपत आहेत. साताऱ्याचा हा परिसर एक डोंगराळ भाग आहे. याठिकाणी येणाऱ्या भूकंपामुळे परिसरात दहशत पसरलेली असते. 

बातम्या आणखी आहेत...