आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Earthquake: चीननंतर आता जपान भूकंपाने हादरले; 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात 16 जण जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपान - चीनमध्ये दुहेरी भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी जपान धरणीकंपाने हादरले. जपानमध्ये मंगळवारी 6.4 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. यानंतर वेळीच प्रशासनाकडून सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला होता. परंतु, काही वेळातच हा इशारा परत घेण्यात आला आहे. या भूकंपाने विविध शहरांमध्ये 16 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, चीनमध्ये सोमवारीच दुहेरी भूकंप झाला. यामध्ये 11 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जपानला भूकंपाचा हादरा बसला आहे.


भूस्खलनाची शक्यता, जनतेला दक्ष राहण्याचे निर्देश
जपानचे पंतप्रधान शिनझो अॅबे यांनी आपले सरकार आणि प्रशासन भूकंप परिस्थितीशी दोन हात करण्यात पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा केला. भूकंपानंतर त्यांनी वेळीच आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाला पीडितांच्या मदतीसाठी रवाना केला. भूकंप मोठा नसला तरीही जनतेने गाफिल राहून चालणार नाही. जनतेने धोकादायक इमारतींपासून दूर राहावे आणि 
एकमेकांना सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. भूकंपानंतर प्रशासनाने बुलेट ट्रेन थांबवल्या. 24 तासांनंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. भूकंपामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे किंवा भूस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर पुन्हा मोठा भूकंप येऊ शकतो अशी भीती देखील जपानच्या हवामान विभागाने व्यक्त केली आहे.