आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरुच, डहाणूत 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, आतापर्यंतचा सर्वात जास्त क्षमतेचा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरुच आहे. पालघर शहरासह परिसरात आजवरचा सर्वात मोठा भूकंपाचा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजून 14 मिनिटांनी डहाणूत 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप आला. घरे तसेच शाळांच्या भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

डहाणूतील भूकंपाची तीव्रता वाढली आहे. आतापर्यंतचा सर्वात जास्त क्षमतेचा धक्का असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गुजरातमधील वापी, दमणमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

बातम्या आणखी आहेत...