आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या - गाद्या-रजाई तयार करण्याऱ्या कंपनीने भारताला कसे बनवले गुलाम, 406 वर्षांपूर्वी या मुघल बादशाहामार्फत केला होता भारतात प्रवेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सूरत :  ईस्ट इंडिया कंपनीने 406 वर्षांपूर्वी 11 जानेवारी 1613 रोजी भारतामध्ये आपला पहिला कारखाना सुरू केला होता. मुघल बादशाहाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी कारखाना सुरु करून उत्पादन निर्मीती करण्यास सुरूवात केली होती. या कारखान्यामध्ये रजाई - गाद्या आणि कपडे तयार करण्यात येत होते. मुघल बादशाह जहागीरने खास धोरणामुळे कंपनीला परवानगी दिली होती. पण कंपनीने नंतर हळूहळू भारतामध्ये व्यापार वाढवला आणि भारताला गुलाम बनवले. 

 

पहिल्या कारखान्यात बनत होते कपडे

> ब्रिटिश लायब्ररी लंडनच्या रेकॉर्डनुसार, 31 डिसेंबर 1600 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. 1608 मध्ये विलियम हॉकिन्स ईस्ट इंडिया कंपनीचे जहाज घेऊन सुरतमध्ये दाखल झाला होता. यानंतर कंपनीने 11 जानेवारी 1613 रोजी सूरतमध्ये आपला पहिला कारखाना सुरु केला. 

> कारखाना सुरु करण्यासाठी कंपनीने मुघल बादशाह जहागीरकडून परवानगी घेतली होती. याआधी कंपनीला जॉन कंपनी नावाने देखील ओळखले जात होते. ब्रिटनची तत्कालीन महाराणीने भारतात व्यवहार करण्यासाठी कंपनीला 21 वर्षांची सूट दिली होती. 

> कंपनी या कारखान्यामध्ये कापूस, गाद्या-रजाई आणि रेशीमचे कापड तयार करत होती. 1920 मध्ये कंपनीची प्रॉडक्शन संख्या 50 हजार पीस करण्यात आले होते. हे सर्व कापडांची लंडनला निर्यात केले जात होते.  


अशा झाला थॉमस रोचा प्रवेश

> पोर्तुगीज याआधीच मुघल बादशाहच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये व्यापार करत होते. पोर्तुगीजांच्या विरोधामुळे ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारामध्ये सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागला होता. यानंतर कंपनीने भारतातील व्यवसाय पाहण्यासाठी थॉमस रोला भारतात पाठविले होते. 

> कंपनीने थॉमस रो याला 1615 मध्ये आपल्या राजदूताच्या रूपात 600 पाउंड या वार्षिक पगारावर कंपनीचा व्यवसाय वाढविण्यासाठी भारतात पाठविले होते. 

 

थॉमस रोने भारतात 3 वर्ष वास्तव्य करून उभारला गुलामगिरीचा पाया

> लेखक बॅम्बर गस्कोइग्ने आपले पुस्तक 'द ग्रेट मुघल्स' मध्ये लिहीले आहे की, थॉमस रो जवळपास 3 वर्ष भारतात राहीला. या तीन वर्षाच्या कालावधीत सूरतसोबत व्यापार करण्यासाठी बंगालमधून सूट मिळवून दिली होती. रो इंग्लंडला परत जाण्याच्या 6 महिन्यांपूर्वी पोर्तुगीजांनी सूरत बंदरावर हल्ला चढवला होता. यावेळी मुघलांनी मात्र इंग्रजांच्या नौ-सेनेकडे मदत मागितली होती. 

> तेव्हा थॉमसने एका अटीवर शाहजहानची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मुघलांना मदत करायच्या मोबदल्यात त्यांनी कंपनीवर कोणत्याही प्रकारचे व्यापारीक प्रतिबंध किंवा कर न आकारण्याच्या अटीवर इंग्रजांनी मुघलांना मदत केली होती. 

> येथूनच भारत इंग्रजांच्या ताब्यात जाण्यास सुरुवात झाली. पण थॉमस जेव्हा इंग्लंडला परत गेला तेव्हा त्याने आपला दौरा अयशस्वी झाल्याचे सांगितले होते. 

 

आपल्याच रणनितीमध्ये फसला होता मुघल बादशाह जहागीर
अपनी ही रणनीति में फंस गया था मुगल बादशाह जहांगीर

> व्यापारासाठी इंग्रजांना परवानगी देण्यामागे जहागीरचे एक धोरण होते. 1618 ते 1750 दरम्यान जहागीर आणि इंग्रजांनी मिळून भारतातील बहुतांश हिंदू संस्थाने खालसा केली होती.  
 > त्यावेळी सिराजुद्दौला बंगालचा नवाब होता आणि तोपर्यंत बंगालवर कोणाचीही नजर पडली नव्हती. पण इंग्रजांनी 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत त्याचाही पराभव केला होता. 

> बंगालचा नवाब सिराजुद्दौला आणि इंग्रजांमध्ये 23 जून 1757 रोजी प्लासी येथे युद्धा झाले. या युद्धात रॉबर्ट क्लाइव याने कंपनीच्या सेनेचे नेतृत्व केले होते. 

> लंडनच्या इंडिया हाऊस लायब्ररीमध्ये या युद्धाविषयी माहिती उपलब्ध आहे. येथे 20 हजारपेक्षा जास्त दस्तावेज आहेत. या दस्तावेजांच्या मते, प्लासीच्या युद्धात इंग्रजांकडे फक्त 300 सैनिक होते आणि सिराजुद्दौलाकडे 18 हजार सैनिकांची मोठी फौज होती. आश्चर्यरित्या कंपनीने सिराजुद्दौलाच्या सेनेचा पराभव केला होता. 

> या युद्धानंतर कंपनीने बघता बघता  म्हैसूरवर देखील ताबा मिळवला आणि हैदराबादच्या निजामाला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले होते. पण कंपनीने मराठा-राजपूतांचे संस्थाने खालसा करण्याची मोहीम सुरू केल्यामुळे निजाम आनंदी होता. या सर्व घटनांनंतर भारत गुलामगिरीकडे गेला. 

बातम्या आणखी आहेत...