आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाणीत १५ लोक उतरले होते, २ तासांनी पाणी भरले, २ दिवसांनी पोहोचले पथक ; १०० दिवसांत एक वगळता इतरांचे मृतदेह आतच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सान (मेघालय) येथून पॅट्रिशिया मुखिम
मेघालयच्या ईस्ट जयंतिया हिल्स भागात असलेल्या साथ येथील कोळसा खाण दुर्घटनेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या अवैध खाणीत पाणी भरल्याने १५ मजूर अडकले होते. या ३७० फूट खोल खाणीत २४ फेब्रुवारीला तिसरा मृतदेह आढळला होता, पण तो काढण्यायोग्य नव्हता. इतर आता दिसणारही नाहीत. माहिती उशिरा मिळाल्याने दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी बचावाचे काम सुरू झाले होते.  त्यामुळे मजुरांचे प्राण वाचण्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे. सध्या तेथे बचाव मोहीम सुरू आहे. दैनिक भास्करने वाचकांसाठी ग्राउंड झिरोहून दिलेला विशेष सविस्तर वृत्तांत..

 

ईस्ट जयंतिया हिल्समध्ये दुर्घटनेआधी जसे होते तसेच सर्वकाही आहे. कोळशाचे अवैध खनन आणि वाहतूक अजूनही होत आहे. सुतंगा या जवळच्या भागात दोन्ही बाजूंना कोळशाचे मोठे ढीग लागलेले आहेत.
दुर्घटनेला १०० दिवस झाले आहेत. खाणीत अडकलेल्यांच्या नातेवाइकांच्या आशा आता संपल्या आहेत.

 

 या खाणीतून वाचून बाहेर आलेली एकमेव व्यक्ती साहेब अली यांनी सांगितले की, ‘१३ डिसेंबरला पहाटे ५ वाजता १५ लोक खाणीत उतरले होते. ७ वाजता अचानक खाणीत पूर आला. खाली पोहोचताच थंड हवेचा तीव्र झोत जाणवला आणि पाण्याचा मोठा आवाज आला. खाणीत पाण्याचा मोठा लोंढा आल्याचे लगेच समजले. मी विलंब न करता ३७० फूट खोलीतून खाणीच्या तोंडाशी आलो.’  कसेतरी वाचून आलेल्या अलींनी खाण मॅनेजरला ही माहिती दिली. जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सूचना मिळाल्यावर त्यांनी मजुरांना बाहेर काढण्यासाठी गुवाहाटी येथील एनडीआरएफला मदत मागितली.  पण त्यांनी कुठलीही तत्परता दाखवली नाही. त्यांचा तर्क होता की, जर मजुरांचा मृत्यू झाला असेल तर त्यात घाई करण्याची गरजच काय? जिल्हा प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे सुरक्षा दलांशी बिलकुल ताळमेळ बसला नाही आणि मोहिमेला विलंब होत गेला. भारतीय नौदलाचे जलतरणपटू २९ डिसेंबरला येथे पोहोचले.  १०० लोकांच्या या टीमचे नेतृत्व कमांडंट एस. के. शास्त्रींकडे होते. ते १५ डिसेंबरलाही साइटवर आले होते, पण त्यांच्याकडे बचावासाठी कोणतेही साहित्य नव्हते. त्यांना १०० हॉर्स पॉवरची गरज होती. पंप बनवणाऱ्या कंपनीशी चर्चा करण्यास आणि साइटपर्यंत पंप बोलावण्यास तब्बल एक महिना लागला.  दुर्घटनेनंतर एक महिन्याने खाणीचे  रोबोटिक इन्स्पेक्शन करण्यात आले. त्यासाठी  रिमोट ऑपरेटेड व्हेईकलची (आरओव्ही) मदत घेण्यात आली. नौदलाच्या जलतरणपटूंसोबत आरओव्ही आणि सहा तज्ज्ञ पथकेही होती. या पथकाला पहिला मृतदेह १७ जानेवारीला दिसला. तो छिन्नविच्छिन्न मृतदेह दुसऱ्या दिवशी काढण्यात आला. पुढच्या आठवड्यात आणखी एक मृतदेह आढळला, पण तो काढण्याच्या स्थितीत नव्हता. २४ फेब्रुवारीला आणखी एक मृतदेह दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...