आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभूतपूर्व यश टिकवण्याचे भाजपला आव्हान, काँग्रेसला पुनरागमनाची संधी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजप आणि शिवसेना युतीने पूर्व विदर्भात अभूतपूर्व विजयाचा 'षटकार' ठोकला. नागपूर विभागात सहा लाेकसभा मतदारसंघ येतात. त्यात नागपूर, रामटेक, भंडारा- गाेंदिया, चंद्रपूर, गडचिराेली- चिमूर व वर्धा या मतदारसंघांचा समावेश अाहे. या सहापैकी पाच मतदारसंघात २०१४ मध्ये भाजपचे कमळ फुलले तर रामटेकमध्ये शिवसेनेने विजयाचा झेंडा रोवला. केंद्रात दाेन मंत्रिपदे व राज्याच्या मुख्यमंत्रिपदासह इतर महत्त्वाची पदे विदर्भाकडे असल्यामुळे या भागाला सत्ताधारी भाजपकडून माेठी अाशा हाेती, मात्र ती अाता पूर्ण झाली नसल्याच्या भावना व्यक्त हाेत अाहेत. याच नाराजीतून माजी खासदार नाना पटोले यांनी भंडारा- गाेंदियाच्या खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सत्ताधारी भाजपला हा माेठा धक्का मानला जाताे. पटाेले यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या भंडारा-गोंदियात पाेटनिवडणूक झाली, त्यातही भाजपला पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीकडून झालेला हा दारुण पराभव सत्ताधाऱ्यांची चिंता वाढवणारा ठरला. 


पाच वर्षात पुलाखालून बऱ्यापैकी पाणी गेले अाहे. या पाेटनिवडणुकीतून तर मोदी लाट विदर्भातूनही बऱ्यापैकी ओसरल्याचे यातून स्पष्ट झाले. त्यामुळे अाता अागामी लाेकसभा निवडणुकीत २०१४ च्या अभूतपूर्व विजयाची पुनरावृत्ती करणे भाजप आणि शिवसेनेला जड जाऊ शकते. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी भक्कम दिसत असताना युतीमधील बेबनावामुळे भाजपच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर) या दिग्गजांपुढे तुलनेने मोठे आव्हान नसले तरी इतर मतदारसंघ मात्र टिकवण्याचे अाव्हान सत्ताधाऱ्यांसमाेर असेल.
 
हवा पूर्व विदर्भाची : नागपूर वगळता इतरत्र भाजपची प्रतिष्ठा पणाला 
भंडारा-गाेंदियाच्या पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादीने दाखवून दिली चुणूक 
नागपूर : गडकरींचा करिष्मा; काँग्रेससमाेर माेठे अाव्हान 

(2009 काँग्रेस) 2014 : भाजप 
54% भाजप 
28% काँग्रेस 
फरक : 26% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप ६ 
प्राबल्य : भाजप 

पूर्व विदर्भाचा राज्यातील राजकारणावर प्रभाव 


चंद्रपूर : काँग्रेसच्या दुहीमुळे भाजपचा मार्ग हाेणार सुकर 
२०१४ मध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूरमध्ये विजयी हॅट्ट्रिक साधली. अहिर यांची लोकप्रियता, अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा प्रभाव व मोदी लाटेच्या जोरावर अहिर सव्वादोन लाखांनी विजयी झाले. काँग्रेसच्या गटबाजीचाही भाजपच्या विजयास हातभार लागला. अाता परिस्थिती बदलली असली तरी काँग्रेसमधील वाद संपलेले नाहीत. असंतुष्ट गटाचे नेतृत्व करणारे नरेश पुगलिया, वडेट्टीवार गटाचे सुभाष धोटे या नेत्यांची नावे अाता उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. भाजपकडून अहिर यांनाच पुन्हा संधी मिळेल. हा मतदारसंघ भाजपला अनुकूल असला तरी काँग्रेसचीही जोरात तयारी आहे. 
(2009 भाजप) 2014 : भाजप 
45.77% भाजप 
24.49% काँग्रेस 
फरक : 21.28% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप 5 
शिवसेना 1 
प्राबल्य : भाजप 
12.5% 
6 लोकसभा, 36 विधानसभा मतदारसंघ 

 

रामटेक : युतीने लढले तरच सेना- भाजपला यश शक्य 
शिवसेनेसाठी रामटेकचा गड आता सोपा नाही. २०१४ मध्ये भाजपच्या साथीने शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी काँग्रेस महासचिव मुकुल वासनिकांना पराभव केला. त्यानंतर विधानसभेला युती तुटल्यानंतर मात्र भाजपने सहापैकी पाच जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. मात्र, आता भाजप, सेनेसाठी अनुकूल परिस्थिती नाही. काँग्रेसकडून मुकुल वासनिक व नितीन राऊतांच्या नावांची चर्चा अाहे. आघाडी भाजपसमाेर भक्कम आव्हान उभे करेल, असे सध्या चित्र अाहे. ते अाव्हान पेलण्याची ताकद फक्त 'युती'तच आहे. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढल्यास हा मतदारसंघ राखणे त्यांना जड जाऊ शकते. 
(2009 काँग्रेस) 2014 : शिवसेना 
49.48% शिवसेना 
32.75% काँग्रेस 
फरक : 16.73% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप 5 
काँग्रेस 1 
प्राबल्य : भाजप 
13.31% 

 

गडचिरोली-चिमूर : अाेबीसी नाराजीची भाजपला धास्ती 
आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेसचे नामदेव उसेंडी यांचा २.३६ लाख मतांनी पराभव केला. नंतर विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपने प्राबल्य सिद्ध केले. मात्र अाता काँग्रेस जोमाने कामास लागली आहे. ओबीसींच्या नाराजीचा लाभ उठवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनांनी भाजपच्या चिंता वाढल्या आहेत. भाजपकडून खासदार अशोक नेते यांच्यासह अंबरीशराजे, दीपक आत्राम यांची नावे चर्चेत अाहेत. तर काँग्रेसकडून नामदेव उसेंडी, नितीन कोडवते, नामदेव किरसान स्पर्धेत असतील. 
(2009 काँग्रेस) 2014 : भाजप 
52.18% भाजप 
29.12% काँग्रेस 
फरक : 23.06% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप 5 
काँग्रेस 1 
प्राबल्य : भाजप 
विभागात कुणाला किती मतदान 
मतदान महाराष्ट्राच्या तुलनेत 

 

भंडारा : जागा गमावल्याने भाजप उमेदवाराच्या शाेधात 
२०१४ मध्ये नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघ भाजपकडे खेचून अाणला. मात्र मध्येच त्यांनी राजीनामा दिल्याने २०१८ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीकडे गेला. 
अाता नूतन खा. मधुकर कुकडे यांच्यासह प्रफुल्ल पटेल किंवा त्यांच्या पत्नी वर्षा यांची नावे राष्ट्रवादीकडून चर्चेत अाहेत. 
भाजपात इच्छुक जास्त असले तरी प्रभावी उमेदवाराची उणीव आहे. डॉ. हेमंत पटले, राजेंद्र पटले व खुशाल बोपचे या पोवार समाजाच्या नेत्यांवर भिस्त ठेवायची की कुणबी समाजाचे आमदार परिणय फुके यांच्यासारख्या बाहेरच्या उमेदवारास रिंगणात उतरवायचे, यावर भाजपमध्ये खल सुरू अाहे. 
(2014 भाजप) 2018 : राष्ट्रवादी 
46.61% राष्ट्रवादी 
41.54% भाजप 
फरक : 5% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप 5 
काँग्रेस 1 
प्राबल्य : भाजप 
भाजप 42.79% (लढवल्या 5 जागा) 
शिवसेना 08.01% (लढवली 1 जागा) 
काँग्रेस 23.73% (लढवल्या 5 जागा) 
राष्ट्रवादी 07.04% (लढवल्या 1 जागा) 
बसप 06.92% (लढवल्या 6 जागा) 
आप 05.55% (लढवली 5 जागा) 

 

वर्धा : काँग्रेसच्या टाेकस, भाजपकडून तडस, मेघे चर्चेत 
वर्धा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला आहे. मात्र मोदी लाटेत रामदास तडस यांनी तो भाजपकडे आणला. २.१५ हजारांचे मताधिक्य मिळवले. मात्र, विधानसभेत भाजप व काँग्रेसची कामगिरी फिफ्टी-फिफ्टी राहिली. आता काँग्रेस व भाजपची 
तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वतीने महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस या एकमेव नावाची चर्चा सुरू आहे. तर भाजपकडून खासदार रामदास तडस यांच्यासह माजी आमदार सागर मेघेदेखील यंदा इच्छुक असल्याचे मानले जाते. मतदारसंघातील वातावरण पाहता भाजपसाठी हा मतदारसंघ राखणे मोठे आव्हान ठरण्याची शक्यता अाहे. 
(2009 काँग्रेस) 2014 : भाजप 
53.04% भाजप 
31.75% काँग्रेस 
फरक : 21.29% 
विधानसभा : 6 जागा 
भाजप 3 
काँग्रेस 3 
प्राबल्य : भाजप, काँग्रेस 

बातम्या आणखी आहेत...