आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईस्टर कार्निव्हलच्या रंगोत्सवात 12 देशांतील नागरिकांचाही सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अथेन्स - भारतातील रंगोत्सवाची आठवण करून देणारा जल्लोष मंगळवारी ग्रीकमध्ये पाहायला मिळाला. अथेन्सपासून २०० किमीवरील गॅलेक्सिडी शहरात हा उत्सव साजरा झाला. या पर्वाला फ्लोर वॉर (िपठाची होळी)  असे म्हटले जाते. लोक मास्क लावून रस्त्यावर उतरले व रंगांची मुक्त उधळण करत त्यांनी सर्वांना विविध रंगात न्हाऊन टाकले. व्यापारी बंदर असलेल्या गॅलेक्सिडीची लाेकसंख्या १७०० आहे. परंतु रंगांची उधळण करण्यासाठी १२ देशांतील नागरिकांसह ४ हजारावर लोक त्यात सहभागी झाले होते. 


ईस्टर कार्निव्हलच्या समारोपात हा उत्सव साजरा केला जातो. होळीनंतर ईश्वराचे आभार व्यक्त करण्यासाठी आबालवृद्धांनी पतंगबाजीही केली. या पर्वाच्या निमित्ताने ग्रीकसह संपूर्ण सायप्रसमध्ये राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. ग्रीसमध्ये ऑटोमन साम्राज्यापासून अर्थात १८०१ पासून या उत्सवाची परंपरा सुरू आहे. होलिका दहनासारखाच पोल नावाचा उत्सव साजरा होतो. 


जगभरात उत्सवाचे विविध रंग : अमेरिकेत स्पेनिश फोर्कमध्ये ४० हजार लोक सहभागी,  दक्षिण कोरियात चिखलात केला जातो जल्लोष 
- जगभरात रंगोत्सव साजरा करण्याच्या अनेक पद्धती पाहायला मिळतात. अमेरिकेत फेस्टिव्हल ऑफ होली असते. स्पॅनिश फोर्कच्या इस्कॉन मंदिरामध्ये ४० हजारावर लोक सहभागी होतात.  {द. कोरियामध्ये दरवर्षी मड फेस्टिव्हल असतो. त्यात माती, चिखलात होळीची परंपरा आहे. 
स्पेनमध्ये लोक ग्रीससारखीच उत्सव खेळतात. त्यास  कॅजकमोराज असे संबोधले जाते. 
- जर्मनीत म्युनिचमध्ये ऑक्टोबरमध्ये उत्सव साजरा केला जातो. बियरची होळी खेळली जाते.
- ब्रिटनमध्ये ग्लॅसटनबरी महोत्सवात लोक रात्रभर जागरण करतात, त्यात पाण्याचा फवारा मारतात. 
- थायलंडमध्ये दरवर्षी चियांग माईमध्ये द वॉटर फेस्टिव्हलही साजरा होता. होळी खेळली जाते. 
- स्पेनमध्ये दरवर्षी टोमॅटिना उत्सव साजरा होतो. हा उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. 

बातम्या आणखी आहेत...