आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळी खा, रक्तप्रवाह सुधारा, पावसाळ्यात निरोगी ठेवतील हे पदार्थ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाला सुरुवात झाली की, अनेक आजारांची साथ पसरायला सुरुवात होते. त्यामुळे अनेकांना अनेक आजारांना सामोर जावे लागते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. हे पौष्टिक पदार्थ आर्टिफिशियल आणि बंद पिशवीतील पदार्थांपेक्षा जास्त फायद्याचे ठरतात. तर जाणून घेऊयात पावसाळ्यात धष्टपुष्ट राहण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर ठरतात. 

लिंबू : लिंबू हे रासायनिक फळ आहे. यामध्ये व्हिटॅमिन 'सी'चे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने शरीरामध्ये शुद्धता, तसेच ताजेपणा निर्माण होण्यास मदत होते. लिंबाचे सेवन केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 


पालेभाज्या : हिरव्या पाले भाज्यांमध्ये सर्व महत्त्वाचे पोषक घटक असल्याने शरीराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्त्वाच्या असतात. भारतामध्ये विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या खाल्ल्या जातात, त्यामध्ये सर्वात लोकप्रिय आहेत पालक, माठ, गोगू, मेथी, शेवग्याची पाने, पुदिना इत्यादी. रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ट करण्यामुळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो. हिरव्या पालेभाज्या कॅल्शियम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोतदेखील आहेत. 


व्हिटॅमिन बी ६ युक्त आहार : व्हिटॅमिन बी ६ मुळे रोग प्रतिरोधक क्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे नैराश्य, तणाव यासारखे आजार होत नाहीत. मिरची, पेरू, लसूण असे अनेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी ६ आढळते. तसेच हे जीवनसत्त्व डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. 


केळी : केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणाऱ्यांनी ब्रेकदरम्यान केळी खाणे फायदेशीर ठरते. अधिक तणाव जाणवत असल्यास केळी खावीत. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास अथवा तुम्ही लवकर थकत असाल तर केळ्यांचे सेवन करावे. केळ्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. 


नारळ : पावसाळ्याच्या दिवसात चेहरा तेलकट होणे ही समस्या तरुणींसमोर उभी राहते. त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेहऱ्याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राहण्यास मदत होईल. आयुर्वेदाच्या मते, नारळाचे पाणी थंड असते. हे पाणी पिल्याने पित्त आणि वातापासून तुम्ही लांब राहू शकता तसेच मूत्राशयाची स्वच्छताही होते. 


व्हिटॅमिन ई युक्त पदार्थ : व्हिटॅमिन ई हे शरीरातील जंतूशी लढण्याची ताकद देते. शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. अंडे, सुका मेवा, पाजेभाज्या, ब्रोकली, आंबा, पपई यांसारख्या पदार्थातून व्हिटॅमिन ई मिळण्यास मदत होते. 


टोमॅटो : टोमॅटोमुळे आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. टोमॅटोमुळे युरिन इन्फेक्शन दूर होते. तसेच रक्त शुद्ध होण्यासही मदत होते. पचनक्रिया सुधारण्यास बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास टोमॅटो फायदेशीर ठरतो. पालक ज्यूसमध्ये टोमॅटो मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. युरिन इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते तसेच रक्त शुद्ध होण्यासाठीदेखील मदत होते.

बातम्या आणखी आहेत...