Health / मध आणि मनुके खा, पचनक्रिया सुधारा 

सतत बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. त्यामध्ये सर्दी-पडसे, खोकला यासारख्या आजारांनी डोक वर काढले आहे. 

दिव्य मराठी वेब

Aug 28,2019 12:25:00 AM IST

सतत बदलत्या वातावरणामुळे सर्वत्र साथीचे आजार पसरले आहेत. त्यामध्ये सर्दी-पडसे, खोकला यासारख्या आजारांनी डोक वर काढले आहे. या आजारावर मनुके आणि मध अत्यंत उपयोगी ठरतात. मनुके आणि मध दोन्हींमधील आयरन, कॅल्शियमसारखे न्यूट्रिएंट्स अनेक आजारांवर मात करण्यास मदत करतात. ही सर्व पोषकतत्त्वे शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. अधिक त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


मनुके आणि मधाचे फायदे
- मनुके आणि मध एकत्र मिसळून खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होतो.
- मनुके तसेच मधात फायबर्स असतात. ज्यामुळे पचनशक्ती सुधारते.


- मनुके, मधामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे खाल्ल्याने चांगली झोप येते.


- मध आणि मनुक्यांमध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे इन्फेक्शनपासून बचाव होतो. या दोन्हीमध्ये फॉलिक अॅसिड असते ज्यामुळे महिलांना गरोदरपणात फायदा होतो.


- मनुके व मध यांच्यात कॅल्शियमची मात्रा अधिक असल्याने सांधेदुखीचा त्रास सतावत नाही.

X
COMMENT