आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने होतात खास फायदे, मानसिक स्वास्थही चांगले राहते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लहान असो की मोठे प्रत्येकालाच चाॅकलेट आवडतात. मात्र दात किडतील, वजन वाढेल या भीतीने बरेच जण चॉकलेट खात नाहीत. चॉकलेटमध्ये लोह, तांबे, फ्लाव्हॅनोलस, जस्त आणि फॉस्फरस यासारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तर जाणून घेऊया चॉकलेट खाण्याचे फायदेही आहेत. > तणाव कमी करण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. > उच्च रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते. > कोकोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात. > हृदयासाठीही चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते. > चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड सुधारतो. कोकोच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते.

वजन घटवण्यात गुणकारी - कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यात मदत होते.

>वैज्ञानिकांनुसार चॉकलेटमधील कोको फ्लॅवनॉल वाढत्या वयासंबंधित आजारांना दूर ठेवते.

>अमेरिकेच्या संशोधनानुसार, रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. स्मरणशक्तीही वाढते.

बातम्या आणखी आहेत...