आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eating Fenugreek Seeds Leads To Very Beneficial Health Benefits

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेथीची भाजी खाणे ठरते अत्यंत फायदेशीर, होतात हे खास आरोग्य लाभ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मेथीपासून अनेक असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थ हेल्दी असतात. आरोग्य चांगले राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजेत. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खायला हवी. थंडीत मेथीची भाजी खाणे फायदेशीर ठरते. मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात. जाणून घेऊया नेमके फायदे कोणते -

पचनक्रिया चांगली राहते : शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करते. अपचन अथवा पोटदुखीवर मेथीचा चहा घ्यावा. सकाळी उठल्यावर मेथीचा काढा घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.

केसांच्या समस्या दूर करते : मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे आणि चमकदार होतात. केस गळतीवर खोबरेल तेलामध्ये मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. नंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. मेथीमुळे केसातील कोंडा दूर होतो

डायबिटिजचा त्रास कमी होतो : ज्या व्यक्तींना डायबिटिजचा त्रास आहे. अशा व्यक्तींसाठी मेथीचे दाणे आणि मेथीची भाजी दोन्ही फायदेशीर ठरतात.

लठ्ठपणा नाहिसा होतो : दररोजच्या आहारात मेथीच्या भाजीचा किंवा दाण्यांचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास फायदा होतो.

कोलेस्ट्रॉल कमी होतो : मेथीचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

मासिक पाळीत आराम : मासिक पाळीतील पोटदुखी दूर होते. आयर्न तयार करण्यासाठी मेथी फायदेशीर ठरते.

त्वचेच्या समस्या दूर हाेतात : मेथीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स, पिम्पल्स, सुरकुत्या कमी होतात. मेथीचे दाणे पाण्यात टाकून उकळा. हे पाणी चेहरा धुण्यासाठी वापरा. तसेच ताज्या मेथीच्या पानांची पेस्ट लावल्यानेही अनेक समस्या दूर होतात.

ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात : मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये कांदा परतून खाल्याने ब्लडप्रेशरची समस्या दूर होते. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.

हृदयाचे आरोग्य : मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन घटकामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाचे ठोके व रक्तदाब नियंत्रित राहतो.