आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजलेले फुटाणे खाल्ल्यामुळे वजन होऊ शकते कमी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही केवळ चवीसाठी फुटाणे खात असाल, तर ते दररोज खा. फुटाणे खाणं शरीरासाठी चांगले आहे. फुटाणे पौष्टिक असतात तसेच यामुळे पोटाचे आजार, बद्धकोष्ठता दूर करण्याचेही काम करतात. बाजारात साल असलेले आणि विना सालाचे असे दोन प्रकारचे फुटाणे मिळतात. शक्यतो टरफल असलेले भाजलेली फुटाणे खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. भाजलेल्या फुटण्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते. 

रोगप्रतिकार क्षमता वाढते : दररोज नाष्टा करताना किंवा दुपारी जेवणाच्या आधी ५० ग्रॅम फुटाणे खाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. त्याशिवाय बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या शारीरिक समस्याही दूर होतात. 

वजन कमी करते : भाजलेले फुटाणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भाजलेल्या चण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते. 

मूत्रासंबंधी रोग : फुटाणे खाल्ल्याने मूत्रासंबंधी समस्या दूर होतात. ज्यांना सतत लघवीला होण्याची समस्या आहे, त्यांना फुटाणे आणि गूळ दररोज खाल्ल्याने काही दिवसांत फरक दिसेल. 

बद्धकोष्ठता : ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांना दररोज फुटाणे खाल्याने फायदा होतो. बद्धकोष्ठता शरीरातील अनेक आजारांचे मूळ कारण ठरते. बद्धकोष्ठता असल्यास दिवसभर आळस, अस्वस्थता जाणवते. 

पचनशक्ती वाढवते : फुटाणे पचनशक्ती संतुलित करण्याचे काम करतात. चण्यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यासही फायदा होतो. चण्यामध्ये फॉस्फरस असते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि किडनीतील अतिरिक्त मीठही निघून जाते. 

मधुमेहासाठी फायदेशीर : मधुमेही रुग्णांसाठीही भाजलेले चणे गुणकारी आहेत. भाजलेले चणे ग्लुकोजचे प्रमाण धरून ठेवते. त्यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो. मधुमेहींनी दररोज भाजलेले चणे खाल्ल्याने ब्लड-शुगर लेव्हल कमी होते. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते. 

बातम्या आणखी आहेत...