आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup/ भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम राहणार 'नो फ्लाय झोन'; सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ईबीसीने घेतला निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क -  विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मंगळवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्या होणार आहे. सध्या आकाशात दाट ढग पसलेले आहेत. पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकादरम्यान सुरक्षेबाबत झालेल्या निष्काळजीपणाच्या दोन घटनानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डने(ईबीसी) सामन्यादरम्यान मैदानावरून कोणतेही विमानाचे उड्डाण होणार नसल्याचे भारतीय क्रिकेट बोर्ड नियामक मंडळ (बीसीसीआय)ला पत्र लिहून सांगितले. संपूर्ण सामना संपेपर्यंत हा विभाग नो फ्लाय झोन राहील.  


सुरक्षेबाबतचे नेमके काय आहे प्रकरण?
शनिवारी भारत आणि श्रीलंका सामन्या दरम्यान मैदानावरून एका विमानाला भारतविरोधा बॅनर झळकवण्यात आले. यावर बीसीसीआयने आसीसीकडे तक्रार केली होती. याअगोदर 29 जून रोजी अफगानिस्तान आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान देखील मैदानावरून जस्टिस फॉर बलूचिस्तान अशा संदेशाचे बॅनर एका खासगी विमानाला लावल्याचे दिसून आले होते. याप्रकारावरून नाराज झालेल्या पाकिस्तानच्या चाहत्यांनी अफगानिस्तानच्या चाहत्यांना मारहाण देखील केली होती. 

 

भारतीय संघाचे पाचव्यांदा अंतिम सामन्यात पोहोचण्याचे लक्ष
न्यूझीलंडला हरवून अंतिम सामन्यात पोहोचण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर दूसरीकडे न्यूझीलंडचा संघ सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल. 2015 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.