आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - प्रसिद्ध शायर दुष्यंतकुमार यांच्या काव्यपंक्ती आठवतात, “कौन कहता है, आसमान मे सुराख नही हो सकता, एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ दक्षिण दिल्लीतील “एकोज’ कॅफेत काम करणाऱ्या मूक-बधिर लोकांसाठी या कवितेच्या ओळी तंतोतंत लागू पडतात.
अशाच प्रकारचे रेस्टॉरंट नॉर्थ कॅम्पस हडसन लेनमध्येही आहे. मूक-बधिर लोकांचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या या रेस्तरांची सुरुवात डिसेंबर २०१५ मध्ये दिल्ली येथे ६ तरुणांनी केली होती. राजौरी गार्डन भागात राहणाऱ्या तरुण मॅनेजमेंट व हॉटेल इंडस्ट्रीत काम करत होते. रेस्तरांमध्ये सध्या ५ तरुण मूक-बधिर वेटर म्हणून काम करत आहेत.
बझर दाबताच वेटर ऑर्डर घेण्यास येतात
दीड वर्षापासून येथे सेवा बजावणारा मूक-बधिर केसले याच्याशी “दिव्य मराठी’ने तेथील हॉटेलचे मॅनेजर रामजितच्या माध्यमातून बातचीत केली. कैसले यांनी सांगितले, मला काही जमेल की नाही, याची कुटुंबातील सर्वांना काळजी वाटायची, पण आता ते समाधानी आहेत. अन्य एक मूक-बधिर विजय याने सांगितले, माझ्यासारखेच अन्य लोकही आहेत. त्यामुळे आम्ही आयुष्यात काही करू शकतो, असा आत्मविश्वास वाटतो. लोक आमच्या सेवेवर खुश आहेत. रेस्तरांमध्ये आलेल्या एका महाविद्यालयातील हिमाक्षी, वैशाली या तरुणींनी सांगितले, येथे बझर दाबताच वेटर येतात.
येथे गेस्ट व कामगार एकमेकांशी जोडले जातात
लोकांचा रेस्तरांमध्ये प्रवेश होताच वेटर हात जोडून त्यांना अभिवादन करतात. लगेच त्यांना इशाऱ्यात बोटे दाखवत विचारतात, किती लोक आहात? लोकही त्यांना इशाऱ्यातच सांगतात. त्यानंतर पहिला वेटर दुसऱ्यास ती संख्या सांगतो. त्यांची बसण्याची सोय करतो. ज्या वेटरला संख्या सांगितली जाते तो त्यांच्यासाठी पाणी आणतो. त्याचबरोबर मेनूकार्ड व नोटपॅड असते. मेनू निवडण्याचा इशारा करतो. मेनूची निवड केल्यानंतर टेबलवर असलेला बझर दाबताच वेटर टेबलवर येऊन ऑर्डर घेतो. काही वेळातच दुसरा वेटर पदार्थ आणतो.
या सहा तरुणांनी केली सुरुवात
गौरव कंवर, प्रतीक बब्बर, साहिब सरना, शिवांश कंवर, साहिल गुलाटी अाणि क्षितिज बहल
हे मूकबधिर तरुण करतात येथे काम
कैसले, विजय, संदीप, मुकेश आणि प्रिन्स अशी त्यांची नावे आहेत
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.