मुंबई / सत्तेला 'शब्दां'चे ग्रहण, निकालाच्या ६ व्या दिवसानंतरही भाजप-शिवसेनेत संभ्रम

  • फडणवीस : पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहीन, भाजपने ५०-५० चे आश्वासन दिले नाही
  • शिवसेना: जुना व्हिडिओ दाखवून करून दिली आठवण, भाजप सोबतची बैठक रद्द
  • राज्यात महायुतीचे सरकार स्थापणार, सीएमचा दावा

प्रतिनिधी

Oct 30,2019 08:31:00 AM IST

​​​​मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि भाजप यांच्यात विधानसभा निवडणुकीत अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचा (५०-५०) फॉर्म्युला ठरला होता, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोडुन काढला. त्यावर शिवसेनेने प्रत्त्यूत्तर देत लोकसभेच्यावेळी दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या महायुतीचा व्हिडिओ शेअर करत alt147जरा याद कराे जुबानी' असे म्हणत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. शिवसेनेच्या या व्हिडिओनंतर त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेत मंगळवारी सायंकाळी alt147५०-५० फाॅर्म्यूल्या'ची बाब माझ्यासमोर आली नाही, असे म्हणाले. दरम्यान, त्यामुळे मंत्रीमंडळाच्या चर्चेबाबत होणारी बैठक ऐनवळी रद्द झाल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात आमचे सरकार पुन्हा स्थापन होईल, यात माझ्या मनात शंका नाही. शिवसेना आणि भाजपच्या बैठका सुरू आहेत. यातून लवकर योग्य तो तोडगा निघेल.
मुख्यमंत्री सकाळी ताठर, सायंकाळी नरमाईची भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नाराज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०-५०च्या फॉर्म्युल्यावरून शब्द फिरवल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री शब्द फिरवत असतील तर बैठका कश्याला घ्यायच्या, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिवसेना-भाजपची मंंत्रीमंडळ स्थापन करण्याबाबतची बैठक रद्द झाली आहे. ही माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परीषद घेऊन दिली. भाजपचे केंद्रातील दोन नेते आणि शिवसेनेचे दोन ज्येष्ठ नेते मंगळवारी मंत्रिमंडळाबाबत चर्चा करणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी ५०-५० चा फार्म्यूला ठरला नसल्याचे सांगितले आहे.

आमच्याकडे प्लान बी नाही, प्लान ए १०० टक्के यशस्वी होईल

शिवसेना आम्हाला पाठिंबा देणार नाही, अशी वेळ येणार नाही. आमच्याकडे कुठलाही प्लान बी नाही. पण प्लान ए १०० टक्के यशस्वी होईल. एकत्र लढलो आहोत. सरकारही एकत्र स्थापन करू,असा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी केला.

शिवसेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात : संजय काकडे यांचा दावा

शिवसेनेचे ४५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप खासदार संजय काकडे यांनी केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचे सरकार यावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यातही शिवसेनेचे आमदार आग्रही असल्याचे काकडे यांनी सांगितले.

माझ्यावर आत्मचरित्र लिहिण्याची वेळ आली नाही

शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराच्या प्रश्नावर बोलताना, प्रचार सभेत पावसात भिजायचं असत, हा अनुभव आमच्याकडे नव्हता, अशी टिप्पणी त्यांनी केली. तर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या आत्मचरित्र लिहण्याच्या वक्तव्यावर त्यांनी माझ्यावर अजून आत्मचरित्र लिहण्याच्या वेळ आलेली नाही, मी योग्य वेळी लिहीन, असे त्यांनी सांगितले. तिकीट वाटपात आम्ही आमच्या काही नेत्याची ताकत जोखण्यात कमी पडलो. त्यामुळे बरेच बंडखोर निवडून आले.

X
COMMENT