आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलसह अनेक माेठ्या कंपन्यांच्या अडचणी व्यापारयुद्धामुळे वाढल्या; आर्थिक मंदीने चीनमधील आयफाेन विक्रीवर परिणाम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे विश्लेषक हैराण झाले आहेत. आयात शुल्क वाढवल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनची अर्थव्यवस्था कमकुवत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे चीन व्यापार धाेरणावर नव्याने विचार करण्यास प्रवृत्त हाेईल, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. ही रणनीती अनेक प्रकरणांत याेग्य ठरली आहे. चीनचा आर्थिक विकास दर कमी झाला आहे. सन २००९ नंतर २०१८ मधील तिमाहीत चीनचा आर्थिक विकास दर सर्वात कमी राहिला. जर दाेन्ही देशांमधील व्यापारी तणाव संपला नाही तर परिस्थिती अधिक गंभीर हाेईल, असे विश्लेषकांना वाटते. 
  
चीनचा विकास दर मंदावल्याचा परिणाम अमेरिकेतील उद्याेग क्षेत्रावरही झाला आहे. परंतु काेणत्याही कंपनीची परिस्थिती अॅपलसारखी दिसत नाही. अॅपल मागील वर्षी सर्वात माेठी कंपनी हाेती. परंतु २ जानेवारी राेजी अॅपलने आपल्या उत्पन्नाचा अंदाजात कपात करत व्यापारी तणावाचा परिणाम झाल्याचे दाखवले आहे. 
 
अॅपलची ६० टक्के विक्री आयफाेनवर अवलंबून आहे. आयफाेनच्या तुलनेत चीनमधील हुआवेईसारख्या स्वदेशी कंपनीचे फाेन स्वस्त आहेत. आयफाेनची खरेदी चीनमधील अनेक ग्राहकांच्या प्राथमिक यादीत नाही. आर्थिक विकास मंदावल्यामुळे चीनमधील ग्राहक खर्च कमी करत आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी गुंतवणूकदारांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आम्ही संकटाचा अंदाज लावला हाेता. परंतु त्याचा आवाका लक्षात आला नाही. या पत्रानंतर कंपनीचे शेअर जवळपास १० टक्के घसरले. यामुळे कंपनी आपल्या तिसऱ्या माेठ्या मार्केटवर अवलंबून राहील का, याचा अंदाज आता विश्लेषक लावत आहेत. इंटरनॅशनल डेटा कार्पाेरेशनचे व्हाइस प्रेसिडेंट रायन रिथ म्हणतात, जर मार्केट घसरले तर त्याचा परिणाम ग्लाेबल मार्केटवर हाेऊ शकताे. अॅपलची परिस्थिती एका वास्तविकतेकडे लक्ष आकर्षित करते. एक-दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या अमेरिकेतील अनेक कंपन्या, तेल उत्पादन करणाऱ्या कंपन्या आपल्या विस्तारासाठी चीनकडे पाहत आहे. यामुळे चीनची अर्थव्यवस्था जितकी कमकुवत हाेईल, तितका प्रभाव अमेरिकन कंपन्यांवर पडणार आहे. अॅपलचे वृत्त आल्यानंतर शेअर बाजार डाऊ जाेन्स इंडस्ट्रीयलमध्ये जवळपास तीन टक्के घट झाली. दुसरीकडे ट्रम्पच्या आक्रमक धाेरणांचाही परिणाम दिसून येत आहे. चीनने अमेरिकन ऑटाे कंपन्यांवरील बंधने काही प्रमाणात कमी केली आहेत. तसेच काही सवलतीही दिल्या आहेत. बीजिंगने अमेरिकेत अधिक माल खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अमेरिकेचा व्यापाराचा ताेटा कमी हाेईल. चीन काही सवलती देत असला तरी तेथील नेते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी विकासाच्या याेजनेत काहीच बदल करणार नाहीत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी एका भाषणात सांगितले की, चीनच्या जनतेला काेणी हे सांगण्याची गरज नाही की, त्यांना काय करायचे आहे, काय नाही. जर ट्रम्प आपल्या धाेरणांमध्ये बदल करणार नाहीत तर उद्योजक व काॅर्पाेरेट जगताला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करावा लागणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...