आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Economic Downturn | Finance Minister Nirmala Sitharaman On Auto Sector Slowdown

आर्थिक मंदी: लोकांचे ओला-उबरला प्राधान्य, यामुळे कार विक्रीवर परिणाम; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे स्पष्टीकरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई  - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑटो क्षेत्रातील मंदीमागे तरुणांची बदलती मानसिकता असल्याचे कारण सांगितले. सीतारमण म्हणाल्या की, लोक नवीन कारसाठी ईएमआय भरण्यापेक्षा तरुण ओला आणि उबर सारख्या रेडिओ टॅक्सी सेवा वापरण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच बीएस -6 तरतुदींचा ऑटोमोबाईल उद्योगावरही परिणाम झाला असल्याचे सीतारमण यांनी चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
 

वाहन क्षेत्राच्या मागणीवर मंत्रालय विचार करेल
सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे माध्यमांना सरकारच्या कामांची माहिती दिली. दोन दशकांतील सर्वात मोठा कोंडी सहन करणाऱ्या ऑटोमोबाइल क्षेत्राच्या मागण्यांवर सरकार विचार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. वित्त मंत्रालयाने यापूर्वीच वाहन क्षेत्रातील काही सूचनांवर विचार केला आहे, इतर काही सूचनांवरही चर्चा केली जाईल असे त्या म्हणाल्या. 
 

वाहनांवरील जीएसटी कमी करावा, वाहन उद्योगातून मागणी  
वाहनांवरील जीएसटी 28% वरून 18% करण्यात यावा अशी वाहन उद्योजकांची मागणी आहे. दरम्यान सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या जीएसटी कमी करण्याच्या प्रश्नावर भाष्य करण्यास नकार दिला. मी एकटीच जीएसटीबाबत निर्णय घेऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. 

वाहन क्षेत्राच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट होण्याचे वातावरण 
भारतीय वाहन उत्पादक संघटनेने (सियाम) सोमवारी ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे जाहीर केले. त्यानुसार वाहनांच्या विक्रीत 1997-98 नंतरची सर्वात मोठी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. ऑगस्ट महिन्यात वाहनांची एकूण विक्री मागील वर्षीच्या या महिन्याच्या 23,82,436 तुलनेत  23.55 टक्क्यांनी घसरून 18,21,490 वाहनांवर आली आहे. देशांतर्गत बाजारात प्रवासी वाहनांची विक्री 31.57 टक्क्यांनी घसरून 1,96,524 इतकी झाली आहे. देशातील आघाडीची प्रवासी कार कंपनी मारुती सुझुकीची विक्री ऑगस्टमध्ये 36.14 टक्क्यांनी घटली.।